दिनविशेष २५ मे
दिनविशेष
दि. २५ मे
◆ जन्म
१. (१८८६) क्रांतिकारक रास बिहारी बोस यांचा जन्म
ते भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतिकारक नेते होते. गदर मुक्ती आणि नंतर भारतीय राष्ट्रीय सेना या संस्थांचे ते मुख्य संयोजक होते
२. (१८९५) इतिहासकार व लेखक त्र्यंबक शंकर शेजवलकर यांचा जन्म
ते मराठी इतिहाससंशोधक, लेखक व संपादक होते. शिवकाल, पेशवेकाल ह्या काळातील इतिहासाविषयी त्यांनी चिकित्सक लेखन केले आहे. निजाम-पेशवे संबंध, पानिपत : १७६१, श्रीशिवछत्रपती इ. त्यांचे ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहेत. इतिहासाप्रमाणेच समाजशास्त्र हाही त्यांच्या चिंतनाचा विषय होता. इतिहास आणि समाजजीवन ह्यांविषयीचे त्यांचे समीक्षणात्मक लेखन प्रगती साप्ताहिकातून प्रकाशित झाले होते. ते या साप्ताहिकाचे संपादक होते
३. (१९१४) जेष्ठ गांधीवादी विचारवंत व महाराष्ट्र विधानसभेचे माजी सभापती बाळासाहेब भारदे यांचा जन्म
बाळासाहेब भारदे हे महाराष्ट्राचे पहिले सहकार मंत्री होते. ते त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष झाले. ते मुरब्बी राजकारणी तर होतेच त्याचबरोबर ते गांधीवादी विचारवंत, संत साहित्याचे अभ्यासक, सहकार क्षेत्रातील अग्रणी, पत्रकारही आणि कीर्तनकार होते
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment