दिनविशेष १८ मे
दिनविशेष
दि. १८ मे
■ दिनविशेष
१. आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन (InternationalMuseumDay)
आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन जगभरात साजरा करण्याची कल्पना प्रथम इंटरनेशनल काउंसिल ऑफ म्यूजियम द्वारे मांडली गेली आणि १९७७ पासून हा दिवस १८ मे रोजी साजरा करण्यास सुरवात झाली. लोकांना इतिहासबद्दल माहिती देण्यासाठी व त्यासंबंधी वस्तू जपण्यासाठी जगभरातील संग्रहालये चांगले कार्य करत आहेत
◆ जन्म
१. (१६८२) छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचे रूपांतर बलाढ्य मराठा साम्राज्यात करणारे कुशल प्रशासक, राजधानी सातारा चे जनक शंभूपुत्र छत्रपती थोरले शाहू महाराज (सातारा) यांचा जन्म
● निधन
१. (१८४६) मराठी पत्रकारितेचे पितामह बाळशास्त्री जांभेकर यांचे निधन
ते मराठी भाषेतील आद्य पत्रकार होते. दर्पण हे मराठीतले पहिले वृत्तपत्र त्यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले. या वृत्तपत्रात इंग्रजी व मराठी भाषेमध्ये मजकूर असायचा. या वर्तमानपत्राचा उद्देश हा स्वदेशीय लोकांमध्ये विलायतेतील विद्यांचा अभ्यास अधिक व्हावा आणि लोकांना त्या देशांची समृद्धी व येथील लोकांचे कल्याण याविषयी स्वतंत्र विचार करता व्हावा हा होता
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment