दिनविशेष १५ मे
दिनविशेष
दि. १५ मे
■ दिनविशेष
१. जागतिक कुटुंब दिन
संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने १९९३ साली जागतिक कुटुंब दिन साजरा करण्याची घोषणा केली होती तेव्हापासून दरवर्षी १५ मे रोजी जागतिक कुटुंब दिन साजरा केला जाऊ लागला. जगभरातील लोकांना त्यांच्या कुटुंबाशी जोडून ठेवण्यासाठी आणि कुटुंबाशी संबंधित गोष्टींबद्दल समाजात जागरूकता पसरवण्यासाठी जागतिक कुटुंब दिन साजरा केला जातो
◆ जन्म
१. (१८१७) भारतीय तत्त्ववेत्ते आणि लेखक देवेंद्रनाथ टागोर यांचा जन्म
ते भारतीय समाजसुधारक आणि तत्त्वज्ञ होते. ते ब्राह्मो समाजाच्या संस्थापकांपैकी एक होते
३. (१९०३) जेष्ठ मराठी समीक्षक, कवी व विचारवंत रामचंद्र श्रीपाद जोग यांचा जन्म
त्यांनी ‘निशिगंध’ ह्या टोपण नावाने कवी म्हणून साहित्यक्षेत्रात प्रथम पदार्पण केले. ज्योत्स्नागीत (१९२६) व निशागीत (१९२८) हे त्यांचे दोन काव्यसंग्रह. सरल भावाविष्कार हे त्यांतील कवितांचे वैशिष्ट्य. १९६० साली ठाणे येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले
● निधन
१. (१३५०) संत जनाबाई यांचे निधन
संत जनाबाई या संत कवयित्री म्हणून जनमानसात लोकप्रिय आहेत. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून स्त्रिया जात्यावर दळण दळताना, कांडताना त्यांच्या ओव्या गातात. संत नामदेवांच्या सहवासात जनाबाईंनीही विठ्ठलाच्या भक्तीचा ध्यास घेतला होता. 'दळिता कांडिता तुज गाईन अनंता' असे त्या म्हणत असत. संत नामदेव हेच त्यांचे पारमार्थिक गुरू होते. श्री संत ज्ञानदेव-विसोबा खेचर-संत नामदेव-संत जनाबाई अशी त्यांची गुरुपरंपरा आहे. संत जनाबाईंच्या नावावर असलेले एकूण सुमारे ३५० अभंग सकल संत गाथा या ग्रंथात मुद्रित झाले आहेत. संत जनाबाईंचे बरेचसे अभंग नामदेव गाथेमध्ये आहेत. त्यांचे अभंग कृष्णजन्म, थाळीपाक, प्रल्हादचरित्र, बालक्रीडा या विषयांवर आहेत
२. (१९९३) स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख फील्डमार्शल के. एम. करिअप्पा यांचे निधन
३. (२००४) शाहीर, कवी आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते वामनदादा कर्डक यांचे निधन
त्यांचे चार काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. कर्डकांनी डॉ. आंबेडकरांवर १० हजारहून अधिक गीते रचली आहेत. लोकशाहीर वामन कर्डक यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपल्या ओजस्वी वाणीतून आणि समर्थ लिखाणातून महाराष्ट्राच्या घरांघरांत खेड्यापाड्यात, वाडीतांड्यांत पोहचवण्याचे काम केले. बुद्ध, फुले, आंबेडकर यांचा विचार हा वामनदादांचा श्वास होता, ऊर्जाकेंद्र होते. हे विचार प्रभावीपणे प्रसारित करत वामनदादा जीवनाच्या शेवटापर्यंत फिरत राहिले. त्यामुळे समाज जागृत होत राहिला
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment