दिनविशेष १३ मे

दिनविशेष

दि. १३ मे

◆ जन्म 

१. (१९०५) भारताचे ५ वे राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांचा जन्म

२. (१९२५) दलित साहित्याचे मर्मग्राही समीक्षक, संपादक डॉ. भालचंद्र दिनकर फडके यांचा जन्म

दलित साहित्याचा त्यांनी वेळोवेळी घेतलेला धांडोळा साक्षेपी समीक्षेचा एक चांगला प्रकार होता. फडके मराठीतील ख्यातनाम समीक्षक होते त्यांची समीक्षेवरील अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांपैकी ‘कथाकार खानोलकर’ (१९६९), ‘दलित साहित्य: वेदना आणि विद्रोह’ (१९७७), ‘मराठी लेखिका: चिंता आणि चिंतन’ (१९८०) ही काही प्रसिद्ध पुस्तके असून त्यामुळे त्यांच्यावर ‘समीक्षक’ ही मुद्रा उमटली. त्यांची समीक्षा मर्मग्राही, सामाजिक भान जागे करणारी आणि काही प्रमाणात प्रेरणा देणारी होती. दलित साहित्याचा त्यांनी वेळोवेळी घेतलेला धांडोळा साक्षेपी समीक्षेचा एक चांगला प्रकार होता

त्यांनी अरविंद गोखले यांच्या कथा संपादित केल्या आहेत आणि कथांची अन्य संपादित पुस्तके ही त्यांच्या नावावर आहेत. डॉ. आंबेडकरांवर त्यांनी चरित्रपर लेखन केले. १९७३ ते १९७६ या काळात मराठी साहित्य पत्रिकाचे (पुणे) ते संपादक होते. त्या काळातील नामवंत समीक्षकांचे लेखन प्रसिद्ध करून त्यांनी पत्रिकेचा दर्जा उंचावला. त्यांची संपादकीय व समीक्षकीय दृष्टी चिकित्सक होती

३. (१९५१) मराठी चित्रपट आणि मराठी नाटकांचे मराठी संगीतकार आणि संगीत दिग्दर्शक आनंद मोडक यांचा जन्म

अवीट चालींच्या गाण्यांनी मराठी संगीत क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटविला. त्यांच्या प्रायोगिक शैलीसाठी ते प्रसिद्ध होते. लपंडाव (१९९३), चौकट राजा (१९९१), तू तिथे मी (१९९८), नातीगोती (२००६), हरिश्चंद्राची फॅक्टरी (२००९), समांतर (२००९) आणि डॅॅंबीस (२०११) हे त्यांचे उल्लेखनीय चित्रपट आहेत. रंगमंचावर व नाटकांमध्ये महानिर्वाण, महापूर, खेळीया, रायगडाला जेव्हा जाग येते, बेगम बर्वे, चौकट राजा (चित्रपट), आणि मुक्ता ह्यांना त्यांचे पार्श्वसंगीत होते

४. (२००१) प्रसिध्द इंग्रजी साहित्यकार रासीपुरम कृष्णस्वामी नारायणस्वामी तथा आर. के. नारायण यांचे निधन

नारायण यांना वाचनाची प्रचंड आवड होती. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी इंग्लिश लेखक डिकिन्स, आर्थर कॅनन डायल आणि थॉमस हार्डी यांच्या लेखनाचे वाचन केले. नारायण हे बारा वर्षाचे असताना त्यांनी भारतीय स्वातंत्र चळवळीमध्ये भाग घेतला ज्यासाठी त्यांना आपल्या काकांचे बोलणे खावे लागले. त्यांचे कुटुंब अराजकीय होते आणि सर्वच सरकारे वाईट असतात असे मानत. ते एक भारतीय इंग्लिश लेखक म्हणून प्रसिद्ध होते. आर. के. नारायण हे मुल्क राज आनंद आणि राजा राव या भारतीय इंग्लिश लेखकांच्या समकालीन होते. त्यांना सोविएत लँड नेहरू पुरस्कार, पद्मभूषण, पद्मविभूषण, साहित्य अकादमी पारितोषिक व ए. सी. बेन्सन पदक या सन्मानांनी गौरविण्यात आले होते

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर