दिनविशेष १२ मे

दिनविशेष

दि. १२ मे

■ दिनविशेष 

१. जागतिक परिचारिका दिन

◆ जन्म 

१. (१८२०) परिचारिका आणि आधुनिक रुग्णपरिचर्या शास्त्राच्या जनक फ्लॉरेंन्स नाईटिगेल यांचा जन्म

त्या अग्रगण्य परिचारिका, लेखक व संख्याशास्त्रज्ञ होत्या. इ.स. १८५३ साली झालेल्या क्राइमियन युद्धदरम्यान जखमी सैनिकांची सुश्रुषा केल्याबद्दल त्यांना प्रसिद्धी मिळाली. त्यांना 'लेडी विथ द लॅम्प' असे म्हणत. अतिशय सुखवस्तू घराण्यात जन्म होऊनही परमेश्वराने आपल्याला भूतदयेसाठी व मानवतेची सेवा करण्यासाठीच जन्माला घातले अशा भावनेने त्या प्रेरित झाल्या होत्या. रेडक्रॉसचे संस्थापक हेन्री ड्युनंट यांनी त्यांना 'लेडी विथ द लॅम्प' ही उपाधी दिली. त्यांच्या हातातील कौशल्य व वैज्ञानिक दृष्टिकोनातून रूग्णसेवा केल्यामुळेच परिचर्याशास्त्राला नवीन दिशा प्राप्त झाली. त्यांच्या सन्मानाप्रित्यर्थ १२ मे हा त्यांचा जन्मदिवस जगभरामध्ये 'जागतिक परिचारिका दिन' म्हणून साजरा केला जातो

२. (१८९५) भारतीय तत्त्वज्ञ जे. कृष्णमूर्ती यांचा जन्म

ते तत्वज्ञान व आध्यात्मिक विषयांमधील भारतीय वक्ते व लेखक होते. विश्वगुरू म्हणून ते ओळखले जात असले तरी हे बिरूद त्यांना मान्य नव्हते. त्यांच्या विषयक्षेत्रांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश होता. मानसिक क्रांती, मनाचे स्वरूप, ध्यान, अभिप्सा, मानवी संबंध व समाजात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणे. प्रत्येक मानवाच्या मनामध्ये क्रांती घडवून आणण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी सतत भर दिला आणि अशी क्रांती कोणत्याही बाह्य सत्तेद्वारा - मग ती धार्मिक, राजकीय वा सामाजिक असो घडवून आणली जाऊ शकत नाही, हेही त्यांनी ठासून सांगितले

 ३. (१९३३) बॅडमिंटनपटू खेळाडू नंदकुमार महादेव नाटेकर ऊर्फ नंदू नाटेकर यांचा जन्म

१९६१ मध्ये सुरू करण्यात आलेल्या अर्जुन पुरस्काराचे ते पहिले मानकरी होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला जेतेपद जिंकून देणारे ते भारताचे पहिले खेळाडू होते. ६० च्या दशकात नाटेकर यांनी बॅटमिंटनमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले. ते एकेरी, दुहेरी आणि मिश्र अशा तिन्ही प्रकारामध्ये खेळले. आपल्या १५ वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी शंभरहून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जेतेपदे जिंकली होती. त्यामुळे त्यांना 'गोल्डन बॉय ऑफ इंडियन बॅडमिंटन' अशी पदवी बहाल करण्यात आली होती

● निधन

१. (१९८४) चरित्रकार अनंत विठ्ठल कीर उर्फ धनंजय कीर यांचे निधन

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागात २३ वर्षे नोकरी करून धनंजय कीर यांनी १९६२ च्या डिसेंबरमध्ये राजीनामा दिला. नोकरीत असताना त्यांनी 'फ्री हिंदुस्थान' ह्या इंग्लिश साप्ताहिकात भारतीय नेत्यांची जी व्यक्तिचित्रे लिहिली ती खूप गाजली. त्यांनी लिहिलेल्या चरित्रात चरित्रनायकाचा व्यक्तिविकास, सत्यनिष्ठ व्यक्तिदर्शन व काळाचे हुबेहूब दर्शन घडते. त्यामुळे त्यांची चरित्रे स्वदेशात व परदेशांत लोकप्रिय झाली आहेत. भारत सरकारने त्यांच्या ह्या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्धल त्यांना 'पद्मभूषण' हा किताब देऊन त्यांचा यथार्थ गौरव केला आहे. शिवाय, नवनालन्दा महाविहार विद्यापीठाने १९७७ साली 'विध्यावारिधि' ही सन्मान्य पदवी देऊन व कोल्हापूर विद्यापीठाने १९८० साली 'डॉक्टर ऑफ लेटर्स ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला आहे

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर