दिनविशेष ०६ एप्रिल
दिनविशेष
दि. ०६ एप्रिल
◆ जन्म
१. (१९०९) भावगीत गायक व संगीतकार जी. एन. जोशी यांचा जन्म
रानारानात गेली बाई शीळ हे त्यांचे भावगीत मराठीतले पहिले भावगीत समजले जाते
२. (१९१७) मराठी कथाकार व कवी, काव्यतीर्थ हणमंत नरहर जोशी तथा कवी सुधांशु यांचा जन्म
त्यांनी अनेक मराठी भावगीते लिहिली आहेत. मराठी कवी कुंजविहारी यांनी ह. न. जोशी यांना सुधांशु हे नाव दिले, आणि पुढे त्याच नावाने ते ओळखले जाऊ लागले
३. (१९३४) अग्रलेखांचा बादशहा म्हणून ओळखले जाणारे नीळकंठ (ऊर्फ निळूभाऊ) खाडिलकर यांचा जन्म
ते दैनिक नवाकाळ या वृत्तपत्राचे जवळपास २७ वर्षे संपादक होते. संपूर्ण अर्थशास्त्र हा विषय घेऊन ते बी.ए. ऑनर्स झाले होते. ज्येष्ठ नाटककार आणि ‘केसरी’चे भूतपूर्व संपादक कृ. प्र. खाडिलकर यांचे ते नातू होत. ते संध्याकाळ या नावाचे सायंदैनिकही काढीत असत
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment