दिनविशेष ३० एप्रिल
दिनविशेष
दि. ३० एप्रिल
◆ जन्म
१. (१८७०) भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक धुंडिराज गोविंद ऊर्फ दादासाहेब फाळके यांचा जन्म
ते चित्रपटनिर्मिती करणारे महाराष्ट्रातील व भारतातील पहिली व्यक्ती होते आणि यासाठीच त्यांना भारतीय चित्रपटांचा जनक मानले जाते. १९१३ साली त्यांनी निर्माण केलेला राजा हरिश्चंद्र हा मूक चित्रपट मराठी व भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील आद्य चित्रपट होय. १९३७ पर्यंतच्या आपल्या १९ वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी ९५ चित्रपटांची व २६ लघुपटांची निर्मिती केली
२. (१९०९) ग्रामविकासातून राष्ट्रविकास होईल हे लक्षात घेवून ग्रामगीतेसारखी महान काव्यरचना करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म
अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली आहे. तुकडोजी महाराजांनी इ.स. १९३५मध्ये मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते
३. (१९२६) मराठी संगीतकार श्रीनिवास खळे यांचा जन्म
त्यांनी आपल्या कर्णमधुर आणि भावपूर्ण गीतांनी मराठी रसिकांना सहा दशकांहून अधिक काळ मोहिनी घातली होती. हिंदी, संस्कृत, गुजराती, बंगाली इत्यादी भाषांमधील गीतांना खळेअण्णांनी जरी स्वरबद्ध केले असले तरी त्यांचे खरे योगदान हे मराठी भावगीत ह्या गीतप्रकारामध्ये आहे. भावगीतांव्यतिरिक्त ‘बोलकी बाहुली’, जिव्हाळा’, ‘पोरकी’, ‘पळसाला पाने तीन’ यासारख्या निवडक सहा मराठी चित्रपटांना खळेअण्णांनी संगीत दिले होते
● निधन
१. (२००३) मराठी साहित्यिक वसंत पोतदार यांचे निधन
ते मराठी लेखक, कथाकथनकार आणि स्वातंत्र्य चळवळीचे इतिहासकार आहेत. पोतदारांना संगीत दिग्दर्शक सी. रामचंद्र यांनी १९६२ साली स्वतःचे साहाय्यक म्हणून काम करण्यासाठी मुंबईत आणले. वसंत पोतदारांनी मराठी, हिंदी आणि बंगाली वर्तमानपत्रांतून भरपूर स्फुट लेखन केले आहे
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment