दिनविशेष २२ एप्रिल
दिनविशेष
दि. २२ एप्रिल
■ दिनविशेष
१. जागतिक वसुंधरा दिवस
जागतिक वसुंधरा दिवस हा पृथ्वीच्या पर्यावरणाच्या संवर्धनासाठी जागृती करण्यासाठी हा दिवस जगभर पाळण्यात येतो. पर्यावरणरक्षणाची शिकवण देण्याच्या हेतूने अमेरिकेचा सिनेटर गेलॉर्ड नेल्सन याने २२ एप्रिल, इ.स. १९७० रोजी पहिल्यांदा पृथ्वी दिनाचे आयोजन केले. पहिला पृथ्वी दिन अमेरिकेतील सॅनफ्रान्सिस्को येथे पाळला गेला, तरीही त्या कार्यक्रमाचा राष्ट्रीय समन्वयक असलेला डेनिस हेस याने स्थापलेल्या संस्थेने इ.स. १९९० साली १४१ देशांमध्ये या दिवसाचे आयोजन करून पृथ्वी दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर नेला. सध्या अर्थ डे नेटवर्क या संस्थेच्या समन्वयाने १७५ देशांमधून हा दिवस साजरा केला जातो. इ.स. २००९ साली संयुक्त राष्ट्रांनी २२ एप्रिल हा दिवस जागतिक वसुंधरा दिन म्हणून पाळण्याची घोषणा केली
◆ जन्म
१. (१८७०) रशियाचे क्रांतीकारी नेते व विचारवंत व्लादिमिर इलिच लेनिन यांचा जन्म
कम्युनिस्ट विचारसरणीत त्यांचे स्थान महत्त्वाचे आहे. लेनिन हे कुशाग्र बुद्धिमत्तेचे साम्यवादी विचारवंत होते. त्यांचे कार्य जगाच्या इतिहासात खरोखरच अतुलनीय व नेत्रदीपक आहे
२. (१९२९) चित्रपट रंगभूमी आणि अभिनेत्री उषा मराठे ऊर्फ उषा किरण यांचा जन्म
३. (१९४५) भारतीय प्रशासकीय अधिकारी आणि राजकारणी गोपाळकृष्ण गांधी यांचा जन्म
त्यांनी भारतीय विदेशी सेवेमध्ये अनेक महत्त्वाची पदे भूषवली. ते एक विख्यात विद्वान असून गांधी आणि आंबेडकरांच्या विचारांचे साक्षेपी अभ्यासक होते
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment