दिनविशेष २१ एप्रिल
दिनविशेष
दि. २१ एप्रिल
■ दिनविशेष
१. भारतीय नागरी सेवा दिन
प्रशासकीय सेवेत स्वत:ला सार्वजनिक सेवेसाठी समर्पित असलेल्या लोकांच्या सन्मानार्थ हा दिन साजरा केला जातो. २१ एप्रिल १९४७ रोजी स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिल्लीतील मेटकाफ हाऊसमध्ये नागरी सेवकांच्या पहिल्या गटाला संबोधित केले होते. त्या दिवसाची आठवण म्हणून २००६ पासून हा दिवस नागरी सेवा दिन म्हणून नियमितपणे साजरा होत आहे
◆ जन्म
१. (१८९६) मराठी राजकारणी, बहुजन समाजोद्धार चळवळीचे नेते केशवराव मारोतराव जेधे यांचा जन्म
ते बहुजन समाजोद्धार चळवळीचे नेते होते. जेधे कुटूंब कान्होजी नाईक यांचे वंशज होते. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चवदार तळ्याच्या मोहिमेत ते सहभागी होते. पुण्याच्या हरिजन सेवक संघाचे ते अध्यक्ष होते. पुण्यातील प्रसिद्ध स्वारगेट चौक हे त्यांच्या नावावर आहे. १९३० पासून त्यांनी काँग्रेसच्या विविध सत्याग्रहांत भाग घेतला. त्यांनी 'शांतीचा गांधी पुतळा। देशा प्यारा जाहला।' ही कविता लिहली
● निधन
१. (१९१०) अमेरिकन विनोदकार आणि कादंबरीकार मार्क ट्वेन यांचे निधन
त्या काळी लेखकांच्या स्वामित्वधनाचा प्रश्न अमेरिकेत गाजत होता. अनेक प्रकाशक लेखकाला न विचारता त्याची पुस्तके प्रसिद्ध करत. त्यामुळे प्रकाशकांचा चांगलाच फायदा होत असे तर लेखकाला काहीच मिळत नसे. अमेरिकी सरकारचे स्वामित्व धनविषयक कायदे लेखकांच्या साठी सोयीचे नव्हते. तत्कालीन कायद्याने पुस्तकाच्या प्रसिद्धीनंतर ४२ वर्षे लेखकाचा त्यावर हक्क मानला जात होता. ट्वेनने या कायद्याच्या विरोधात अनेक लेख लिहिले व भाषणे केली. डिसेंबर १९०६ मध्ये ‘लायब्ररी ऑफ अमेरिकन काँग्रेस’च्या सभेत लेखकांच्या स्वामित्वधनाच्या मुद्द्यावर ट्वेन यांना साक्ष देण्यासाठी बोलावले होते. लेखकाच्या मृत्यूनंतर किमान ५० वर्षे पुस्तकाच्या स्वामित्वाचे हक्क त्याच्या वारसाकडे राहिले पाहिजेत, अशी मागणी त्यांनी तिथे केली
२. (१९३८) सारे जहॉंसे अच्छा या लोकप्रिय गीताचे लेखक, कवी आणि तत्त्वज्ञ सर मुहम्मद इक्बाल यांचे निधन
मोहम्मद इकबाल उर्फ अल्लामा इक्बाल हे उर्दू भाषेतील नामवंत कवी.
३. (२०१३) भारतातील काॅम्पूटर म्हणून शंकुतला देवी यांचे निधन
शकुंतला देवी १९४४ मध्ये लंडनला गेल्या. लंडनला गेल्यावर पुढे त्यांनी संपूर्ण जगामध्ये प्रवास केला आणि आपल्या बुद्धिमत्ता आणि गणितीय कौशल्याचे वेगवेगळे चमत्कार दाखवून त्यांनी संपूर्ण जगाला चक्रावून सोडले.१९७६ साली आपल्या अमेरिका दौऱ्यात त्यांनी संगणकापेक्षा अधिक वेगाने आकडेमोड पूर्ण करून त्याची उत्तरे परीक्षकांसमोर अचूक सादर केली.
इ.स. १९७७ मध्ये डलास विद्यापीठात शकुंतलाचा मुकाबला तत्कालीन सर्वात जलद काॅम्प्यूटर 'युनिव्हॅक'शी झाला. तेथे शकुंतलादेवीने एका २०१ अंकी संख्येचे २३ वे मूळ ५० सेकंदात काढले व फळ्यावर लिहिले. हे मूळ काढायला काॅम्प्यूटरला ६२ सेकंद लागले.
१८ जून १९८० मध्ये त्यांना ७६८६३६९७७४८७० आणि २४६५०९९७४५७७९ ह्या दोन संख्या गुणाकारासाठी देण्यात आल्या .हे आकडे लंडनच्या इम्पीरियल कॉलेजच्या संगणक विभागाने निवडलेले होते .शकुंतला देवी यांनी या दोन आकड्यांचा अचूक गुणाकार करून दाखवत केवळ २८ सेकंदामध्ये १८९४७६६८१७७९९५४२६४६२७७३७३० हे उत्तर दिले. १३ आकडी दोन संख्यांचा गुणाकार त्यांनी फक्त २८ सेकंदात पूर्ण केला.त्यांच्या याच कामगिरीमुळे त्यांना ह्युमन कॉम्प्युटर म्हणून ओळखले जाऊ लागले आणि शकुंतला देवी याचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये विराजमान झाले
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment