दिनविशेष १५ एप्रिल
दिनविशेष
दि. १५ एप्रिल
■ दिनविशेष
१. जागतिक कला दिन
प्रबोधनकालीन युरोपातील महान कलावंत 'लिओनार्डो द व्हिन्सी' यांचा जन्मदिवस दरवर्षी 'जागतिक कला दिन' म्हणून साजरा केला जातो
◆ जन्म
१. (१८९३) चरित्रकार, टीकाकार, इतिहास संशोधक, संत साहित्याचे अभ्यासक व लेखक नरहर रघुनाथ तथा न. र. फाटक यांचा जन्म
ते मराठी प्राध्यापक, प्रकांड पंडित, पत्रकार, चरित्रलेखक, इतिहाससंशोधक, मराठी संत वाङ्मयाचे चिकित्सक व साहित्यसमीक्षक होते. न.र. फाटके हे १९३७ साली विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. हैदराबाद येथे १९४७ साली भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचेही ते अध्यक्ष होते
२. (१९३२) कवी सुरेश भट यांचा जन्म
सुरेश भट हे मराठीतील एक सुप्रसिद्ध कवी होते. त्यांनी मराठी भाषेत गझल हा काव्यप्रकार रुजवला. त्यामुळे त्यांना 'गझल सम्राट' असे मानाने संबोधले जाते
● निधन
१. (१८६४) अमेरिकेचे १६ वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचे निधन
अमेरिकन युद्धादरम्यान त्यांनी अमेरिकेचे संरक्षण केले. त्यांनी गुलामगिरीचा अंत करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांनी गुलामगिरीचा अंत करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. ते लोकशाहीचे कट्टर समर्थक होते आणि त्यांनी लोकशाहीचे रक्षण केले
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment