दिनविशेष १४ एप्रिल
दिनविशेष
दि. १४ एप्रिल
◆ जन्म
१. (१८९१) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म
ते भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना 'आधुनिक भारताचे शिल्पकार' किंवा 'आधुनिक भारताचे निर्माते' असेही म्हणतात
२. (१९१४) अभिनेत्री शांता हुबळीकर यांचा जन्म
त्या एक मराठी, हिंदी, कानडी चित्रपट अभिनेत्री, गायिका होत्या. त्यांनी 'माणूस' चित्रपटामध्ये गायलेले 'आता कशाला उद्याची बात' हे गाणे प्रसिद्ध झाले होते. त्यांनी त्याच नावाने आत्मचरित्र लिहिले आहे
३. (१९२७) विनोदी लेखक द. मा. मिरासदार यांचा जन्म
ते मराठीतले साहित्यिक, कथाकथनकार, विनोदी लेखक, पटकथाकार आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष होते. द. मा. मिरासदार ध्वनीक्षेपकासमोर उभे राहून हातवारे करीत बोलू लागले की, श्रोत्यांना एक अद्भुत नाट्य अनुभवायला मिळे
४. (१९४३) वात्रटिकाकार, कवी, पटकथा, लेखक, निर्माते, दिग्दर्शक रामदास फुटाणे यांचा जन्म
ते महाराष्ट्रातले एक व्यंग्यकवी आणि पटकथा लेखक, चित्रपट निर्माते व दिग्दर्शक आहेत. रामदास फुटाण्यांच्या कोपरखळ्या मारणाऱ्या छोट्याछोट्या कवितांनी महाराष्ट्रीय वाचकांचे अनेक वर्षे मनोरंजन केले आहे
● निधन
१. (१९६२) श्रेष्ठ अभियंते भारतरत्न सर मोक्षमुंडम विश्वेश्वरैया यांचे निधन
भारतात त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रत्येक वर्षी १५ सप्टेंबर हा दिवस अभियंता दिन म्हणून पाळला जातो
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment