दिनविशेष १३ एप्रिल
दिनविशेष
दि. १३ एप्रिल
★ घटना
१. (१९१९) जालियनवाला बाग हत्याकांड
१३ एप्रिल इ.स. १९१९ या दिवशी इंग्रजांच्या भारतावरील राजवटीत जनरल डायर याने अमृतसर येथील जालियनवाला बाग या ठिकाणी हत्याकांड घडवून आणले. जनरल डायर याच्या हुकुमावरून लष्कराने निशस्त्र लोकांच्या सभेवर रायफलींच्या १,६०० फैरी झाडल्या. या सभेत स्त्रिया आणि पुरूषांसोबत लहान मुलांचाही समावेश होता. या हत्याकांडामधे ४०० लोकांचा मृत्यू झाला
◆ जन्म
१. (१८९०) भारतीय चित्रपट निर्माते, मराठी चित्रपटांचे आद्य प्रवर्तक रामचंद्र गोपाळ तोरणे तथा दादासाहेब तोरणे यांचा जन्म
त्यांनी निर्मिती, दिग्दर्शन आणि चित्रपट वितरण क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडवून आणले. वयाच्या २१ व्या वर्षी तोरणेंना स्वत:च चित्रपट तयार करावा, अशी कल्पना सुचली. त्यांनी ही कल्पना त्यांचे मित्र नानाभाई चित्रे या आपल्या मित्राला सांगितली. चित्रे तेव्हा ॲडव्होकेट इंडिया या सायंदैनिकाचे मुख्य व्यवस्थापक होते. त्यांनी तोरणेंच्या चित्रपटाला आर्थिक साह्य केले. मात्र, बॉर्न अँड शेफर्ड कंपनीकडे चित्रपट बनविण्यासाठी लागणारा कॅमेरा आहे हे चित्रे यांना कळाले, तेव्हा ते स्वत:च त्यांच्याकडे गेले आणि त्यांना हजार रुपयांच्या बदल्यात विल्यम्सन कॅमेरा, चित्रपटांसाठी लागणारी रिळे आणि छायाचित्रकार देण्यासाठी राजी केले. अखेर मुंबईच्या मंगलदास वाडीत १९०९ साली चित्रीकरणाला सुरुवात झाली. जिथे आत्ता नाझ थिएटर आहे. हिंदू संतांवर आधारित ‘श्री पुंडलिक’ या मराठी नाटकावर आधारित चित्रपट काढायचे ठरले
भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक गोष्टी प्रथम करण्याचा मान तोरणेंकडे जातो. मेहबूब खान (मेहबूब कलाघर), करदार, भालजी पेंढारकर, विश्राम बेडेकर, आर. एस. चौधरी, सी रामचंद्र, जयश्री, रत्नमाला, आलम आरामधील झुबेदा यांसारख्या अनेक गुणी कलाकारांना तोरणेंनी प्रथम संधी दिली
२. (१८९५) भारतातील वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे पद्मभूषण वसंत रामजी खानोलकर यांचा जन्म
रामजींचा वैद्यकीय वृत्तीसोबतच संस्कृत भाषेचा गाढा अभ्यास होता. त्यांच्याकडे अनेक मूल्यवान आणि दुर्मिळ पुस्तकांचा संग्रह होता. कर्करोग आणि कुष्ठरोग यावर त्यांनी तीन पुस्तके आणि शंभरहून जास्त शोधनिबंध प्रकाशित केले आहेत
३. (१९१३) थोर देशभक्त, सत्याग्रही, स्वातंत्र्यसेनानी दत्ताजी ताम्हाणे यांचा जन्म
ते एक थोर देशभक्त स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांच्या जन्मदिनीच म्हणजे १३ एप्रिल १९१९ या दिवशी जालियनवाला हत्याकांड झाले. त्यामुळे पुढे देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत दत्ताजींनी आपला वाढदिवस साजरा केला नाही
● निधन
१. (१९५१) औंध संस्थानचे अधिपती भवानराव श्रीनिवासराव तथा बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांचे निधन
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment