दिनविशेष ०७ मार्च
दिनविशेष
दि. ०७ मार्च
◆ जन्म
१. (१९३८) दैनिक पुण्यनगरी वर्तमानपत्राचे संस्थापक अध्यक्ष मुरलीधर उर्फ बाबा शिंगोटे यांचा जन्म
वृत्तपत्र विक्रेते ते वृत्तपत्र मालक हा त्यांचा संघर्षमय जीवनप्रवास होता. वृत्तपत्र विकताना सर्वसामान्यांना समजेल आणि वाचता येईल अशा भाषेतले वृत्तपत्र काढण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले होते
‘मुंबई चौफेर’ नावाचे सायं दैनिक बाबा शिंगोटे यांनी १९९४ मध्ये सुरु केले. यानंतर दैनिक आपला वार्ताहर, दैनिक यशोभूमी, दैनिक कर्नाटक मल्ला, तामिळ टाईम्स, हिंदमाता ही दैनिके सुरु केली. यातल्या दैनिक पुण्यनगरीची मुहूर्तमेढ १९९९ मध्ये रोवली
● निधन
१. (१९२२) मराठी रंगभूमी वरील नट गणपतराव जोशी यांचे निधन
मराठी रंगभूमीवरील एक असामान्य नट म्हणून गणपतराव जोशी यांना ओळखले गेले. शेक्सपिअरच्या नाटकांच्या मराठी रूपांतरांतील नायकांच्या भूमिकांनी गणपतराव यांना नाट्यक्षेत्रात वेगळी उंची दिली
त्यांच्या चंद्रसेन (हॅम्लेट), झुंझारराव (ऑथेल्लो), मानाजीराव (मॅक्बेथ) आणि प्रतापराव (टेमिंग ऑफ द श्रू ) या त्यांच्या भूमिका अतिशय गाजल्या. अत्यंत सुरेल व असाधारण तेजस्वी आवाज हे गणपतरावांच्या अभिनयाचे प्रमुख वैशिष्ट्य होते. एखाद्या अद्वितीय गायक नटाच्या आवाजासारखी, गद्य नाटकातून काम करणाऱ्या गणपतरावांच्या आवाजाची मोहिनी तत्कालीन प्रेक्षकांवर पडली होती. शेक्सपिअरच्या नाटकांतील नायकांच्या मनोजीवनाचे रहस्य समजावे या हेतूने महाविद्यालयीन विद्यार्थी त्यांच्या नाटकांना गर्दी करीत असत, तर इंग्रज प्रेक्षक केवळ अभियानाच्या आस्वादाचा आनंद घेऊन गणपतरावांच्या हॅम्लेट (चंद्रसेन) सारख्या भूमिकेची मुक्तकंठाने प्रशंसा करीत असत
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment