दिनविशेष ०६ मार्च

दिनविशेष

दि. ०६ मार्च

■ दिनविशेष 

१. राष्ट्रीय दंत चिकित्सक दिन

भारतातील दंत स्वास्थ्याविषयी जागरुकता वाढविण्यासाठी दरवर्षी ६ मार्चला राष्ट्रीय दंत चिकित्सक दिन साजरा करण्यात येतो. आपण दंतपणाच्या चांगल्या सवयी आणि स्वच्छतेसाठी या दिवशी प्रयत्नशील होऊ शकतो

◆ जन्म 

१. (१९६५) भारीतय शास्त्रीय गायिका देवकी पंडित यांचा जन्म

अल्फा मराठी या वाहिनी वरील ‘आभाळमाया’ या लोकप्रिय मालिकेच्या शीर्षक गीताच्या सुरावटीमधून त्या घराघरात पोहचल्या. दूरचित्रवाणीवरील अनेक मालिकांच्या शीर्षकगीतांमधून देवकी ताई यांचे सुर रसिकांच्या कानावर येत राहिले आणि मनात रुंजी घालत राहिले. रामायण, आभाळमाया, वादळवाट, अधुरी एक कहाणी, अवघाचि संसार, सांजभूल, जगावेगळी, बंधन, तुझ्याविना ,काटा रुते कुणाला, सांजसावल्या, किमयागार, जिवलगा, तू माझा सांगाती अशा अनेक लोकप्रिय मालिकांची शीर्षकगीते त्यांनी गायली. इतक्या मोठ्या संख्येने दूरचित्रवाणीवरील मालिका गीते गाणाऱ्या देवकी पंडित या एकमेव गायिका आहेत

● निधन

१. (१९९२) सुप्रसिद्ध मराठी लेखक रणजीत देसाई यांचे निधन

मराठी इतिहासाला बोलके करणारे लेखक म्हणून रणजीत देसाई यांच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील श्रीमान योगी, कर्ण या व्यक्तिरेखेवरील राधेय या त्यांच्या प्रसिद्ध कलाकृती आहेत

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर