दिनविशेष ०१ एप्रिल

दिनविशेष

दि. ०१ एप्रिल

■ दिनविशेष

१. (१८९५) भारतीय लष्कराची स्थापना 

भारतीय सैन्याची भारतीय लष्कर, भारतीय नौदल व भारतीय वायुदल, अशी तीन घटक सैन्यदले आहेत. त्यातील लष्कराची स्थापना १ एप्रिल १८९५ रोजी झाली

२. (१९३५) भारतीय रिझर्व बँक या भारतातल्या मध्यवर्ती बॅंकेची स्थापना

भारतीय रिझर्व बँकेचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे. भारतीय रिझर्व बँक ही देशपातळीवर आर्थिक संस्थांना शिस्त आणण्याचे काम करते. रिझर्व बँक वार्षिक, सहामाही तसेच तिमाही आर्थिक धोरण व पतधोरण (मौद्रिक धोरण व पतधोरण) जाहीर करते

◆ जन्म 

१. (१९३९) वैचारिक लेखन करणाऱ्या मराठी लेखिका तारा भवाळकर यांचा जन्म

तारा भवाळकर या लोकसाहित्य, लोकसंस्कृती, लोकपरंपरा आणि लोककला या विषयांच्या लेखनाशी संबंधित आहेत. त्या वरील सर्व विषयांच्या गाढ्या अभ्यासक आहेत. त्यांनी लोकसंस्कृती, नाट्यसंशोधन, संतसाहित्य, एकांकिका, ललित लेखन, लोककला यांविषयी तसेच स्त्री जाणिवांवर लक्ष केंद्रित करणारे विपुल लेखन केले आहे. त्यांनी लोककला आणि लोकसाहित्य या विषयांशी संबंधित अनेक चर्चा, परिसंवाद, संमेलने यांत भाग घेतला आहे

तारा भवाळकरांनी पौराणिक नाटक, लोकनाट्य, दशावतार, तंजावरची नाटके, यक्षगान, कथकली अशा नाट्य प्रकारांची जडणघडण शोधली. त्यांचे समग्र लेखन वस्तुनिष्ठ, यथार्थ व चिकित्सक दृष्टी आणि सैद्धांतिक अभ्यासाचा वस्तुपाठच आहे. मराठी विश्वकोश, मराठी वाड्मयकोश आणि मराठी ग्रंथकोश या महत्त्वाच्या कार्यातही त्यांनी बहुमोल योगदान दिले आहे

● निधन

१. (१९८९) समाजवादी, कामगार नेते आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अध्वर्यू श्रीधर महादेव जोशी (एस. एम. जोशी) यांचे निधन

पत्रकारिता, लेखन, वक्तृत्व, राजकारण व समाजकारण या क्षेत्रांत त्यांनी उत्तुंग कार्य केले. एस. एम. जोशी हे संयुक्त महाराष्ट्र समितीचे सक्रिय सभासद होते 

२. (२०००) मराठी कवयित्री संजीवनी मराठे यांचे निधन

या कविता गायनासाठी प्रसिद्ध असलेल्या मराठी कवयित्री होत्या

३. (२००६) बाल साहित्यकार राजा मंगळवेढेकर यांचे निधन

हे मराठी बालसाहित्यकार आणि चरित्रकार होते. स्वातंत्र्यचळवळीत सक्रिय सहभाग घेत असताना त्यांना साने गुरुजींचा सहवास लाभला. यातूनच त्यांना मुलांसाठी लिहिण्याची प्रेरणा मिळाली. आजवर मंगळवेढेकरांनी विपुल साहित्यनिर्मिती केली आहे. यामध्ये २०० पेक्षा जास्त गोष्टी, कथा, कविता, चरित्रे, पत्रे आणि विज्ञान व पर्यावरण याविषयीची पुस्तके आहेत. आपला भारत, शोध भारताचा या त्यांच्या गाजलेल्या पुस्तकमालिका असून त्यांनी लिहिलेले साने गुरुजींचे चरित्रदेखील प्रसिद्ध आहे

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर