दिनविशेष २२ मार्च

दिनविशेष

दि. २२ मार्च

■ दिनविशेष 

१. जागतिक जल दिन

सन १९९३ पासून २२ मार्च हा दिवस जागतिक जल दिन म्हणून साजरा केला जातो. ताज्या पाण्याचे महत्त्व आणि या नैसर्गिक स्त्रोताच्या व्यवस्थापनाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी हा दिवस (World Water Day) साजरा केला जातो

जगण्यासाठी पाणी अत्यंत गरजेचे आहे. पाण्याशिवाय मनुष्य, प्राणी, सजीवसृष्टीची कल्पनाही करता येणार नाही. पृथ्वीवर पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असले तरी त्यातील केवळ २.५ टक्के पाणी पिण्यासाठी, वापरासाठी योग्य आहे. बाकी सर्व खारे पाणी आहे, जे सेवन करता येत नाही. त्यामुळे भावी पिढ्यांसाठी पाण्याचे संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे

★ घटना

१. (१९७०) हमीद दलवाई यांनी पुणे येथे मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली

◆ जन्म 

१. (१९२४) मराठी नाटककार आणि पटकथाकार मधुसूदन कालेलकर यांचा जन्म

● निधन

१. (१९८४) मराठी साहित्य विश्वात आपल्या लेखनाने वादळ निर्माण करणारे व मोलाची भर टाकणारे विचारवंत, ख्यातनाम लेखक आणि पत्रकार प्रभाकर पाध्ये यांचे निधन

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर