दिनविशेष २४ मार्च
दिनविशेष
दि. २४ मार्च
■ दिनविशेष
१. जागतिक क्षयरोग (टी. बी) दिन
इ.स. १८८२ साली डॉ. रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जिवाणूंचा शोध लावला. त्यांचा प्रबंध जागतिक शास्त्रज्ञांच्या परिषदेत मांडला व त्यास दिनांक २४ मार्च रोजी मान्यता मिळाली. म्हणून दरवर्षी २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो
क्षय (TB) रोग हा एक जिवाणुजन्य आजार (Bacterial diseases) आहे. एकेकाळी या रोगाचा समावेश हा दुर्धर आणि कधीही बरा न होणाऱ्या रोगांमध्ये होत होता. मात्र आता या आजारांवर अनेक औषधोपचार (Medication) निघाल्याने हा रोग पूर्ण पणे बरा होतो
या आजाराबाबत लोकांच्या मनात आजही अनेक गैरसमज आहेत. या आजाराला टीबी म्हणून देखील ओळखले जाते. हा आजार ‘मायकोबॅक्टेरिया’ या प्रकारच्या जिवाणूंमुळे होत असतो. त्यातील मुख्यत्वे ‘मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलॉसिस’ या प्रकारामुळे माणसाला क्षयरोग होतो. या आजारात ७५ % रुग्णांच्या फुफ्फुसांना बाधा होते. तर काही रुग्णांच्या इतर अवयवांवर देखील याचा परिणाम होतो
◆ जन्म
१ (१९७१) राजकीय समीक्षक व प्रसिद्ध भारतीय व्यंगचित्रकार सतीश आचार्य यांचा जन्म
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment