दिनविशेष २३ मार्च
दिनविशेष
दि. २३ मार्च
■ दिनविशेष
१. जागतिक हवामान दिन
जागतिक हवामान दिन (World Meteorological Day) दरवर्षी २३ मार्च रोजी साजरा केला जातो. जागतिक हवामान दिनाची सुरुवात १९६१ मध्ये जागतिक हवामान संघटनेच्या निर्मितीच्या (स्थापना २३ मार्च १९५० रोजी) स्मरणार्थ करण्यात आली. ही संघटना दरवर्षी जागतिक हवामान दिनानिमित्त घोषवाक्य जाहीर करते. हा दिवस जागतिक हवामान संघटनेच्या सर्व सदस्य देशांमध्ये साजरा केला जातो
२. (१९३१) शहीद दिवस
भारतीय क्रांतिकारी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली. त्यासाठी हा दिवस शहीद दिवस म्हणून पाळला जातो
◆ जन्म
१. (१९१०) समाजवादी नेते आणि विख्यात संसदपटू डॉ. राममनोहर लोहिया यांचा जन्म
ते भारतीय स्वातंत्र्य सैनिक, विचारवंत आणि समाजवादी राजकारणी होते. ९ ऑगस्ट १९४२ रोजी जेव्हा गांधीजी आणि इतर काँग्रेस नेत्यांना अटक करण्यात आली तेव्हा लोहिया भूमिगत राहिले आणि त्यांनी भारत छोडो आंदोलन देशभर पसरवले
● निधन
१. (१९८२) सातारा चे सुपुत्र, माथाडी कामगारांसाठी, मराठा समाजासाठी अमूल्य योगदान देणारे नेते अण्णासाहेब पाटील यांचे निधन
२. (१९८८) पंजाबी कवी आणि क्रांतीकारी अवतार सिंह संधू उर्फ पाश यांचे निधन
पाश हे त्या ठाराविक क्रांतीकारी कवींमध्ये मोडतात ज्यांनी आपल्या कवितांद्वारे पंजाब मध्येचं नाहीतर पूर्ण देशभरात आपली एक ओळख निर्माण केली. जे स्थान क्रांतीकारकांमध्ये भगतसिंग यांना आसे तेचं स्थान पाश यांना क्रांतीकारी कवींमध्ये आहे
३. (२००७) मराठी साहित्यिक श्रीपाद नारायण पेंडसे यांचे निधन
ते मराठी भाषेतील एक कथालेखक व कादंबरीकार होते. कादंबरी, कथा, नाटक, व्यक्तिचित्रण, आत्मचरित्र अशा विविध वाड्मय प्रकारांत लेखन केलेल्या पेंडसेंची मराठी साहित्यात ओळख आहे ती कादंबरीकार म्हणूनच होती
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment