दिनविशेष २१ मार्च

दिनविशेष

दि. २१ मार्च

★ महत्वपूर्ण घटना 

१. माणगाव परिषद 

दि. २१ व २२ मार्च १९२० रोजी माणगाव येथे महाराष्ट्रातील बहिष्कृत वर्गाची ऐतिहासिक परिषद पार पडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच यापुढे देशातील अस्पृश्य व दलित वर्गाचे नेतृत्व करतील अशी घोषणा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी या परिषदेत केली होती

■ दिनविशेष

१. जागतिक जंगल दिन

लोकांमध्ये वृक्षसंवर्धनाच्या बाबतीत जाणीव जागृती व्हावी यासाठी २१ मार्च हा दिवस जागतिक वन दिन म्हणून साजरा करण्याची संकल्पना १९७१ मध्ये युरोपियन कॉन्फिडरेशन ऑफ ॲग्रिकल्चर च्या २३ व्या बैठकीत पुढे आली. वनसंवर्धन मानव जीवनासाठी, समृद्धीसाठी आवश्यक आहे. त्यांचा अंगीकार सर्वांनी करणे आवश्यक आहे

२. जागतिक कविता दिन

युनायटेड नॅशनल एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशनने १९९९ मध्ये पॅरिसमधील ३० व्या सर्वसाधारण परिषदेदरम्यान २१ मार्च हा जागतिक कविता दिन म्हणून स्वीकारला. कविता सर्व प्रदेशातील लोकांना एकत्र येण्यास मदत करते. कविता लुप्त होत चाललेल्या भाषांचे संरक्षण देखील करू शकते. अधिक लोकांना काव्यात्मक अभिव्यक्ती आणि भाषिक परंपरेबद्दल जागरूक करण्याची संधी प्रदान करते

जागतिक कविता दिन विविध कारणांसाठी महत्त्वपूर्ण आहे. हा दिवस आपल्या जीवनातील कवितेचे महत्त्व याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी, व्यक्तींना कविता वाचण्यास, लिहिण्यास प्रोत्साहित करण्यासाठी आणि भाषेचे सौंदर्य आणि शब्दांच्या सामर्थ्याचे कौतुक करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून कार्य करतो. हा दिवस सामाजिक आणि सांस्कृतिक विविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी कवितेच्या भूमिकेवर आणि जगातील असंख्य भाषा आणि संस्कृतींचे जतन करण्याच्या क्षमतेवर भर देतो

◆ जन्म 

१. (१८८७) देशभक्त,  क्रांतिकारक व भारतातील कम्यूनिस्ट पक्षाचे संस्थापक मानवेंद्रनाथ रॉय यांचा जन्म

२. (१९१६) शहनाई वादक भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला ख़ाँ यांचा जन्म

ते भारतातील प्रख्यात शहनाई वादक होते. त्यांचा जन्म डुमराव बिहार मध्ये झाला. सन २००१ मध्ये त्यांना भारतातील सर्वोच्च सन्मान 'भारतरत्न' देऊन सन्मानित केले गेले

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर