दिनविशेष १८ मार्च

दिनविशेष

दि. १८ मार्च

■ दिनविशेष

१. जागतिक पुनर्वापर दिन

जागतिक पुनर्वापर दिन दरवर्षी १८ मार्च रोजी साजरा केला जातो. या दिवसाचे उद्दिष्ट म्हणजे कचऱ्याचा पुनर्वापर (Recycling) वाढवून पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि नैसर्गिक साधनसंपत्तींचा विवेकी वापर करणे.

आजच्या वाढत्या शहरीकरणामुळे आणि उद्योगधंद्यांमुळे मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो. प्लास्टिक, धातू, काच, कागद आणि इलेक्ट्रॉनिक कचरा यांचा योग्य प्रकारे पुनर्वापर केल्यास पृथ्वीवरील भार कमी होऊ शकतो. या प्रक्रियेमुळे ऊर्जा बचत, प्रदूषण नियंत्रण आणि हवामान बदलावर नियंत्रण मिळवणे शक्य होते

या दिवसाचे मुख्य ब्रीद म्हणजे Recycling Hero, ज्याअंतर्गत लोकांना आणि कंपन्यांना पुनर्वापर सवयी लावण्यास प्रोत्साहित केले जाते. प्रत्येकाने आपापल्या स्तरावर कचऱ्याचे वर्गीकरण करून पुनर्वापर करण्याची सवय लावल्यास पृथ्वीवरील संसाधनांचे जतन होईल आणि पर्यावरण संतुलन राखले जाईल. त्यामुळे, पुनर्वापर हा आपला सामाजिक आणि नैतिक जबाबदारीचा एक महत्त्वाचा भाग आहे

◆ जन्म 

१. (१५९४) पराक्रम, युद्धप्रसंगीची बुद्धिमत्ता, उत्तम प्रशासन  व स्वतंत्र राज्यकारभार ही मूलभूत गुण-कौशल्य असलेले ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व स्वराज्य संकल्पक शहाजी राजे भोसले यांचा जन्म

छत्रपती शिवाजी महाराजांचे ते वडील होतं

२. (१९०५) मराठीतल्या स्त्रीवादी लेखिका मालती बेडेकर यांचा जन्म

या मराठीतल्या आद्य स्त्रीवादी लेखिका समजल्या जातात. त्यांनी सहा कादंबऱ्या, दोन कथासंग्रह, सहा प्रबंध, प्रौढ साक्षरांसाठी चार पुस्तके, पाच नाटके आणि एक चित्रपटकथा लिहिली. तसेच पाच इंग्लिश पुस्तकांची मराठी भाषांतरे केली

विभावरी शिरुरकर या टोपण नावानं त्यांनी त्या काळात स्त्रीजीवनाचं केलेलं लेखन खळबळजनक ठरलं. या नावाने लिहलेली त्यांची बळी, शबरी व घराला मुकलेल्या स्त्रिया ही पुस्तके खूप गाजली. ही पुस्तके लिहिण्यापूर्वी श्रद्धा, बी.के., कटुसत्यवादिनी, एक भगिनी किंवा बाळुताई खरे या नावांनीही मालतीबाईंनी लेखन केले

३. (१९३८) हिंदी चित्रपट सृष्टीतील जेष्ठ अभिनेते शशी कपूर यांचा जन्म

ते हिंदी चित्रपटसृष्टीतले एक  अभिनेते आणि दिग्दर्शक होते. त्यांचे वडील पृथ्वीराज कपूर आणि मोठे बंधू राज कपूर यांच्यामुळे त्यांच्या घरात पहिल्यापासून सिनेमाचे वातावरण होते

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर