दिनविशेष १७ मार्च
दिनविशेष
दि. १७ मार्च
◆ जन्म
१. (१९१०) समाजसेविका अनुताई वाघ यांचे निधन
या आदिवासी समाजासाठी काम करणाऱ्या समाजसेविका व शिक्षणतज्ज्ञ होत्या. त्यांनी शिक्षणाद्वारे आदिवासींच्या जीवनात जागृती निर्माण करण्याचे काम केले. पालघर जिल्ह्यातील कोसबाड येथे ताराबाई मोडक यांचेसोबत त्यांनी बालशिक्षणाचे कार्य केले
आदिवासींच्या शिक्षणासाठी अंगणवाडी प्रशिक्षणवर्ग, अध्यापक प्रशिक्षणविद्यालय, उद्योगप्रशिक्षण, स्त्रीशक्ती जागृती संस्था, रात्रशाळा, ३० प्रौढशिक्षण संस्था अश्या अनेक संस्था त्यांनी स्थापन केल्या
प्रबोधनासाठी वाहिलेल्या शिक्षणपत्रिका व स्त्रीजागृतीसाठी असलेल्या ‘सावित्री’ मासिकाच्या त्या संपादिका होत्या. कोसबाडच्या टेकडीवर आदिवासींच्या उन्नतीसाठी एक संस्था स्थापन केली. या संस्थेलाच 'कोसबाड प्रकल्प'म्हणून ओळखले जाते. आदिवासींच्या शिक्षणासाठी पाळणाघरे, बालवाड्या, प्राथमिक शाळा, प्रौढ शिक्षण वर्ग, बालसेविका ट्रेनिंग काॅलेज इ. शैक्षणिक संस्था सुरू केल्या
● निधन
१. (१८८२) आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचे निधन
ते मराठी निबंधकार, लेखक, पत्रकार आणि देशभक्त होते. त्यांचे वडील कृष्णशास्त्री चिपळूणकर हे देखील एक नामवंत लेखक होते. विष्णूशास्त्री यांनी इतिहास, अर्थशास्त्र, तर्कशास्त्र व नीतिशास्त्र या विषयांचा तसेच इंग्रजी, संस्कृत व मराठी या भाषांतील उत्तमोत्तम ग्रंथाचा सखोल अभ्यास केला होता
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment