दिनविशेष १६ मार्च
दिनविशेष
दि. १६ मार्च
◆ जन्म
१. (१६९३) थोर मुत्सद्दी, सेनानी, महान योद्धे श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांचा जन्म
ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याच्या माळवा (मध्य प्रदेश) प्रांताचे पहिले सुभेदार होते. मराठ्यांचे उत्तर भारतात वर्चस्व प्रस्थापित करण्यात मोठा वाटा असलेल्या मल्हाररावांना इंदूर संस्थानाची जहागिरी मिळाली होती. मल्हारराव आपल्या पराक्रमाने, कसलीही घराणेशाहीची परंपरा नसतांना स्वबळावर पुढे येत मराठेशाहीचे मुख्य आधारस्तंभ बनले. ते एक धोरणी, मुत्सद्दी व शिवरायांच्या गनिमी काव्याला अंगीकारणारे सेनानी होते
२. (१९३६) संगीतकार भास्कर चंदावरकर यांचा जन्म
ते एक भारतीय संगीतकार आणि संगीताच्या परंपरांचे अभ्यासक होते. विचारमूलक संगीतसाधना हा त्यांच्या एकूणच व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य गाभा होता. संगीतासंदर्भात त्यांनी केलेले तात्त्विक विवेचन आजही प्रमाण मानले जाते. स्पष्ट आणि परखड विचार, हेही त्यांचे वैशिष्ट्य होते
● निधन
१. (१९९०) स्वातंत्र्यसैनिक, रोजगार हमी योजनचे जनक महाराष्ट्राच्या विधानपरिषदेचे माजी सभापती वि. स. पागे यांचे निधन
कै. पागे यांनी महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले. १९७७ साली महाराष्ट्रात पागे यांच्या सूचनेमुळे अस्तित्वात आलेल्या रोजगार हमी योजना कायद्यामुळे गोरगरीब जनतेला मोठा लाभ झाला. महाराष्ट्राचे पुरोगामित्त्व सिद्ध करणारा हा क्रांतिकारक कायदा होता, असं कामत यांनी सांगितले
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment