दिनविशेष १३ मार्च

दिनविशेष

दि. १३ मार्च

● निधन

१. (१८९९) दत्तात्रेय कोंडो घाटे उर्फ कवी दत्त यांचे निधन

कवी दत्त यांच्या बहुसंख्य कविता इ.स. १८९७ व इ.स. १८९८ या काळातील आहेत. त्या काव्यरत्नावली, मनोरंजन, सुविचार समागम, बालबोध मेवा, करमणूक इत्यादी नियतकालिकांतून प्रसिद्ध झाल्या. एकूण ५१ कविता आज उपलब्ध आहेत. त्यांपैकी ४८ कवितांचा संग्रह त्याचे शिक्षणतज्ज्ञ चिरंजीव कवी वि. द. घाटे यांनी इ.स. १९२२ साली दत्तांची कविता या नावाने प्रसिद्ध केला. ’नवे पान’ या डॉ. मा. गो. देशमुख संपादित संग्रहात मात्र त्यांच्या सर्व कविता आहेत

२. (१९९४) मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातील सिटू या कामगार संघटनेचे लढवय्ये नेते श्रीपाद यशवंत कोल्हटकर यांचे निधन

३. (१९९६) अभिनेते आणि नाट्यनिर्माते शफी इनामदार यांचे निधन

'अर्ध सत्य' या चित्रपटातील अभिनयाने त्यांना ओळख मिळवून दिली

४. (२००४) भारतीय सतारवादक उस्ताद विलायत खाँ यांचे निधन

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर