दिनविशेष १२ मार्च
दिनविशेष
दि. १२ मार्च
★ महत्वपूर्ण घटना
१. (१९३०) साबरमती आश्रम येथून ऐतहासिक दांडी यात्रा महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली
१२ मार्च ही भारताच्या स्वातंत्र चळवळीच्या इतिहासातील महत्वाची तारीख मानली जाते. अहमदाबादच्या साबरमती आश्रमातून सुरू झालेल्या या यात्रेचा उद्देश म्हणजे ब्रिटिशांनी लागू केलेला मिठाचा कायदा मोडून काढणं हा होता. ही यात्रा ब्रिटीशांविरुद्ध निषेधाचं प्रतिक ठरली
◆ जन्म
१. (१८९१) अभिनेते आणि निर्माते नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर यांचा जन्म
सातारा येथे ‘तुकाराम’ या नाटकात त्यांनी ‘मंबाजी’ची भूमिका साकारून (१९०७) रंगभूमीवर प्रवेश केला. नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर याचं बोट धरून ते महाराष्ट्र नाटक मंडळीत आले
२. (१९१३) भारताचे माजी उपपंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि महाराष्ट्राचे पहिले मुखमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा जन्म
त्यांनी काही काळ भारताचे उपपंतप्रधान म्हणून काम केले होते. तर काही काळ ते भारताचे संरक्षणमंत्री सुद्धा होते. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ते ओळखले जातात. ते प्रागतिक विचारसरणीचे होते. उत्कृष्ट संसदपटू, उदारमतवादी व अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ख्याती आहे. ते रसिक व साहित्यिकही होते. युगांतर, सह्याद्रीचे वारे, कृष्णाकाठ, ऋणानुबंध ही त्यांची साहित्यसंपदा आहे
३. (१९३३) जेष्ठ मराठी लेखिका कविता विश्वनाथ नरवणे यांचा जन्म
जेष्ठ मराठी लेखिका कविता विश्वनाथ नरवणे हे भारावून टाकणारे व्यक्तिमत्त्व होते. प्रसिद्ध लेखिका व आवडत्या प्राध्यापिका म्हणून त्या परिचित होत्या. त्यांनी अनेक दिवाळी अंकात लेखण केले. त्यांचे अनेक कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. विविध साहित्य प्रकारांत त्यांनी लेखण केले होते. ओघवती भाषा आणि सुरेख विश्लेषण ही त्यांच्या लेखणाची वैशिष्ट्ये आहेत
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment