दिनविशेष ०९ फेब्रुवारी

दिनविशेष

दि. ०९ फेब्रुवारी

◆ जन्म 

१. (१९१७) गांधीवादी नेते, सिक्‍कीमचे पहिले राज्यपाल, मंत्री व आमदार होमी जे. एच. तल्यारखान यांचा जन्म

२. (१९२९) महाराष्ट्रचे ८ वे मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांचा जन्म

● निधन

१. (१९७९) चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते राजा परांजपे यांचे निधन

ते मराठी चित्रपटसृष्टीतील व हिंदी चित्रपटसृष्टीतील चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते होते. ४० वर्षाच्या कारकिर्दीमध्ये राजा परांजपे यांनी ८० पेक्षा जास्त मराठी आणि हिंदी चित्रपटांसाठी कामे केली.

२. (२००८) कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक डॉ. मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे यांचे निधन

ते एक मराठी समाजसेवक होते. कुष्ठरोग्यांच्या शुश्रूषेसाठी त्यांनी चंद्रपूर, महाराष्ट्र येथे आनंदवन नावाचे आश्रम त्यांनी सुरू केले. ते कुष्ठरोग्यांसाठी आणि समाजातील इतर उपेक्षितांसाठी खूप झटत होते. याशिवाय 'वन्य जीवन संरक्षण', 'नर्मदा बचाओ आंदोलन' अशा इतर सामाजिक चळवळींमध्येही त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर