दिनविशेष ०८ फेब्रुवारी
दिनविशेष
दि. ०८ फेब्रुवारी
◆ जन्म
१. (१८९७) भारताचे तिसरे राष्ट्रपती झाकीर हुसेन यांचा जन्म
ते भारताचे तिसरे राष्ट्रपती होते. मे १३, इ.स. १९६७ ते मे ३, इ.स. १९६९ पर्यंत त्यांनी राष्ट्रपतीपद सांभाळले. हुसेन नामवंत शिक्षणतज्ज्ञ होते. १९५७ ते १९६२ या काळात त्यांनी बिहारचे राज्यपाल म्हणून कार्य केले. हुसेन यांच्याखाली, जामिया भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी घनिष्ठपणे संबंधित झाले. इ.स. १९६३ मध्ये त्यांना भारताचा सर्वोच्च नागरिक सन्मान, भारतरत्न पुरस्कार देण्यात आला
२. (१९२५) प्रसिद्ध गायिका शोभा गुर्टू यांचा जन्म
त्या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका होत्या. त्या शास्त्रीय संगीतात पारंगत तर होत्याच, परंतु उपशास्त्रीय संगीत गायकीवर त्यांचे विशेष प्रभुत्व होते. त्यांचे अभिनय अंगाने ठुमरी गायन रसिकप्रिय होते. लोकांनी त्यांना 'ठुमरी सम्राज्ञी' म्हणून नावाजले होते
३. (१९४१) प्रसिद्ध गायक जगजीत सिंह यांचा जन्म
ते ख्यातनाम भारतीय गझलगायक, संगीतकार होते. इ.स. १९७० आणि इ.स. १९८० च्या दशकात गायिका पत्नी चित्रा सिंह यांच्यासमवेत जगजीत यांनी केलेल्या गझलांच्या संगीत ध्वनिमुद्रिका प्रचंड लोकप्रिय ठरल्या. त्यांना गझलसम्राट या नावाने ओळखले जाऊ लागले. पंजाबी, हिंदी, उर्दू, बंगाली, गुजराती, सिंधी आणि नेपाळी या भाषांमधून जगजीतसिंह यांनी गायन केले
● निधन
१. (१९९९) आनंदग्रामच्या संस्थापिका व थोर समाजसेविका डॉ. इंदुताई पटवर्ध यांचे निधन
त्यांनी डुडुळगाव येथील आनंदग्रामची स्थापना केली होती. कुष्ठरोग्यांच्या जीवनात आनंद फुलवण्यासाठी त्यांनी महत्त्वाचे काम केले
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment