दिनविशेष २५ फेब्रुवारी
दिनविशेष
दि. २५ फेब्रुवारी
● निधन
१. (१९६४) बहुगुणी चित्रपट अभिनेत्री शांता आपटे यांचे निधन
नायिका शांता आपटे यांनी १९३१ ते १९५३ या काळात रुपेरी पडद्यावर आणि मराठी संगीत रंगभूमीवर साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहिल्या. त्यांच्या 'कुंकू' चित्रपटामधील निरा या भूमिकेमुळे जाचक परंपरेला विरोध करणारी स्त्रीची प्रतिमा निर्माण झाली. बंडखोर शांताबाईनी 'पंडित नेहरू' यांच्या विनंतीवरून 'वंदे मातरम' हे गीत सुमधुर स्वरात गायले होते
२. (१९८०) लेखिका व नाटककार गिरजाबाई महादेव केळकर यांचे निधन
गिरिजाबाई केळकरांनी ’पुरुषांचे बंड’ नावाचे नाटक लिहिले, आणि त्या मराठीतल्या पहिल्या स्त्री नाटककार झाल्या. हे नाटक खाडिलकरांच्या ‘बायकांचे बंड’ या १९०७ मध्ये रंगभूमीवर आलेल्या लोकप्रिय संगीत नाटकाला सडेतोड प्रत्युत्तर म्हणून लिहिले होते. मराठीतील पहिल्या नाटककार गिरिजाबाईंना, त्यांच्या साहित्यसेवेबद्दल इ.स. १९२८ मध्ये मुंबईत भरलेल्या २३ व्या मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याचा सन्मान मिळाला
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment