दिनविशेष २४ फेब्रुवारी

दिनविशेष

दि. २४ फेब्रुवारी

■ दिनविशेष 

१. जागतिक मुद्रण दिन

मुद्रण कलेचे जनक जोहान गुटेनबर्ग यांचा जन्मदिवस जागतिक मुद्रण दिन म्हणून साजरा केला जातो. छपाई यंत्राचा शोध लागल्यामुळे लिखित कल्पना विचार लोकांपर्यंत पोहचवणे शक्य झाले आहे. मुद्रण कलेच्या शोधामुळेच आज आपण वैचारिकदृष्ट्या समृद्ध आहोत

आज आपण सोशल मीडिया क्षेत्रात केलेली प्रगतीही मुद्रण कलेचा उत्तम नमुना आहे. मुद्रण कलेचा विकास झाल्यावर संगणकावरून कमांड देऊन मुद्रण तंत्र विकसित झाले. त्यामुळे मुद्रण कमी वेळात पूर्ण होणे शक्य झाले. कालांतरानंतर इंटरनेटचा विकास झाला आणि मीडिया विकसित झाला. या विकासामुळे आपण सहजरित्या टाईप करू शकतो

 ◆ जन्म 

१. (१६७४) कोल्हापूरजवळील नेसरीच्या खिंडीत बहलोलखानाच्या फौजेवर हल्ला करताना सेनापती प्रतापराव गुजर व त्यांचे ६ सहकारी मारले गेले

या प्रेरणादायी घटनेवरच कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी 'वेडात मराठे वीर दौडले सात' हे काव्य लिहिले

२. (१९५५) अमेरिकेतील अ‍ॅपल या जगप्रसिद्ध कंपनीचे सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्ज यांचा जन्म

'आयफोन', 'आयपॉड', 'आयपॅड' हे लोकप्रिय, बहूपयोगी उत्पादने त्यांच्यामुळेच बाजारात आले. स्टीव जॉब्स यांना उपभोक्ता संगणक क्षेत्रातील नवीनतेचे व अविष्कारचे जनक म्हणून संबोधले जाते. भारत भेटीनंतर त्यांच्यावर बौद्ध धर्माचा खूप प्रभाव पडला व त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर