दिनविशेष २३ फेब्रुवारी
दिनविशेष
दि. २३ फेब्रुवारी
◆ जन्म
१. (१८७६) किर्तनातून समाजातील दांभिकपणा, रूढी, परंपरावर टीका करणारे, समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य यांची शिकवण देणारे थोर समाजसुधारक संत गाडगे महाराज यांचा जन्म
ते महाराष्ट्र राज्यातील एक किर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे
२. (१९१३) जादूगार प्रफुल्लचंद्र तथा पी. सी. सरकार यांचा जन्म
पी. सी. सरकार यांनी सुमारे ७० देशांत जादूचे प्रयोग केले. त्यांतून त्यांना अपार धन आणि कीर्ती लाभली. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय दूरचित्रवाणी वाहिन्यांवर त्यांचे कार्यक्रम अनेकदा प्रसारित झाले. काहीशा हीन लेखल्या गेलेल्या आणि दीर्घकाळ दुर्लक्षित राहिलेल्या जादू कलेला सरकार यांनी भारताबरोबरच जगभर प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यामुळे ‘भारतीय जादूकलेचे पितामह’ असा त्यांचा सार्थ उल्लेख केला जातो
भारतीय स्वातंत्र्य चळवळ सुरू असतानाच दुसरीकडे सरकार यांचे कार्यक्रम देश-विदेशांत मोठया प्रमाणावर होत होते; मात्र सरकार यांना कर्तव्याचा विसर पडला नाही. १९३७ मध्ये त्यांनी जपानचा दौरा केला. त्या दौऱ्यातील सर्व कार्यक्रमांतून जमा झालेली मिळकत त्यांनी स्वातंत्र्य चळवळीसाठी देणगी म्हणून दिली
३. (१९६५) अशोकचक्र पुरस्काराने सन्मानित पोलीस अधिकारी अशोक कामटे यांचा जन्म
२६/११ च्या मुंबई येथे झालेल्या आंतकवादी हल्यात दहशतवाद्यांशी लढताना अशोक कामटे यांना वीरमरण आले होते
● निधन
१. (१९६९) आपल्या मोहक हास्याने आणि अभिनयाने चित्रपट सृष्टीत वेगळे स्थान निर्माण करणारी अभिनेत्री मधुबाला यांचे निधन
त्यांनी ऐतिहासिक चित्रपट मुगल-ए-आज़म मध्ये अनारकली हे पात्र साकारले होते. त्या चित्रपटाला अभूतपूर्व प्रतिसाद, प्रसिद्धी आणि भरघोस नफा मिळाला होता
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment