दिनविशेष २१ फेब्रुवारी
दिनविशेष
दि. २१ फेब्रुवारी
■ दिनविशेष
१. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन
आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन दर वर्षी २१ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. १७ नोव्हेंबर १९९९ ला युनेस्को ने हा दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून जाहीर केला. २००० पासून आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन जगभरात शांतता, बहुभाषिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सर्व मातृभाषांचे संरक्षण करण्यासाठी साजरा करण्यात येऊ लागला. भाषा आपल्या मूर्त आणि अमूर्त वारसाचे जतन आणि विकास करण्याचे सर्वात शक्तिशाली साधन आहे
◆ जन्म
१. (१८९४) वैज्ञानिक डॉ. शांतिस्वरुप भटनागर यांचा जन्म
ते भारतीय रसायनशास्त्रज्ञ होते. स्वातंत्र्योत्तर काळात भारताचा औद्योगिक विकास होण्याच्या दृष्टीने भारतात राष्ट्रीय प्रयोगशाळांची आणि वैज्ञानिक संशोधन केंद्रांची मालिका स्थापन करण्यात भटनागर यांनी बहुमोल कामगिरी केली. कौन्सिल ऑफ सायन्टिफिक ॲन्ड इंडस्ट्रियल रिसर्च चे (सी.एस.आय.आर.) ते शिल्पकार होते
२. (१८९६) हिंदी साहित्यिक सूर्यकांत त्रिपाठी निराला यांचा जन्म
वृत्तीने ते बंडखोर आणि विचाराने क्रांतिवादी होते. आर्थिक संघर्षाबरोबरच साहित्यिक मान्यतेसाठीही त्यांना संघर्षच करावा लागला. जीवनभर कराव्या लागलेल्या संघर्षाचा परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर व परिणामतः काव्यावर झालेला आहे
३. (१९४२) मराठी अभिनेत्री जयश्री गडकर यांचा जन्म
१९५६ मध्ये वयाच्या १४ व्या वर्षी 'दिसतं तसं नसतं' या चित्रपटाद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण झाले. जयश्री गडकर यांना मानिनी, वैंजयंता, सवाल माझा ऐका व साधी माणसं या चित्रपटांसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment