दिनविशेष २० फेब्रुवारी

दिनविशेष

दि. २० फेब्रुवारी

■ दिनविशेष 

१. जागतिक सामाजिक न्याय दिन

लिंग, वंश, धर्म, संस्कृती व अपंगत्व याबाबतीत असलेला भेदभाव आणि असमानता दूर करण्यासाठी २००७ साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने २० फेब्रुवारी हा दिवस जागतिक सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यास मंजुरी दिली. २००९ पासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. सर्वांसाठी सामाजिक न्याय हा सर्वांच्या विकास आणि मानवी प्रतिष्ठेच्या हक्कासाठी जागतिक अभियानाचा मुख्य पाया आहे. संपूर्ण विश्वात सामाजिक न्याय प्रस्थापित व्हावा स्थैर्य निर्माण व्हावे यासाठी हा आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे

◆ जन्म 

१. (१९०५) भारतातील सर्कस उद्योगाचे जनक विष्णुपंत छत्रे यांचे निधन

ते मराठी उद्योजक आणि आशियातील पहिले सर्कसमालक होते. ऑक्टोबर ५, इ.स. १८७८ रोजी त्यांनी स्थापन केलेल्या सर्कशीचा पहिला प्रयोग कुरुंदवाडाला झाला. पुढे नोव्हेंबर २४, इ.स. १८७९ रोजी मुंबईस त्यांच्या ग्रेट इंडियन सर्कशीचा पहिला प्रयोग झाला

● निधन

१. (२०१५) महाराष्ट्राच्या परिवर्तनवादी चळवळीचे शिलेदार, पुरोगामी विचारांच्या प्रसारासाठी वैचारिक लढा देणारे विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे निधन

ते महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचे विचारवंत व कम्युनिस्ट कामगार नेते होते. इ.स. १९५२ पासून कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य असलेले पानसरे अनेक सामाजिक चळवळीत सक्रिय होते. त्यांनी कामगारांसाठी तसेच घर कामगार महिलांसाठी अनेक लढे उभारले. ते कोल्हापूर टोलविरोधी आंदोलनातही अग्रभागी होते

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील जीवनचरित्र 'शिवाजी कोण होता ?' या पुस्तकाचे लेखक कॉ. गोविंद पानसरे यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज यांचे खरे जीवनचरित्र लोकांपर्यंत पोहचवण्यात या पुस्तकाचा मोलाचा वाटा आहे

२. (२०२४) भारतातील लोकप्रिय रेडिओ जॉकी आणि रेडिओ उद्घोषक अमीन सयानी यांचे निधन

रेडिओ सिलोन वर त्या त्या आठवड्यात प्रसिद्धी मिळवणाऱ्या चित्रपट गीतांची मालिका 'बिनाका गीतमाला' कार्यक्रम ते सादर करत असत. या कार्यक्रमाने त्यांना संपूर्ण भारतीय उपखंडात प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर