दिनविशेष १८ फेब्रुवारी
दिनविशेष
दि. १८ फेब्रुवारी
◆ जन्म
१. (१८२३) पत्रकार, समाजसुधारक व इतिहासकार रावबहादूर गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी यांचा जन्म
मातृभाषेतून शिक्षण या तत्त्वाचा त्यांनी प्रसार केला. बालविवाह, हुंडा, बहुपत्नीकत्व या अनिष्ट प्रथांवर त्यांनी आपल्या लेखनातून आणि भाषणांतून हल्ला चढविला. प्रभाकर नावाच्या साप्ताहिकातून लोकहितवादी या टोपणनावाने यांनी समाजसुधारणा विषयक शतपत्रे (वस्तुतः संख्येने १०८) लिहिली
भारतीय समाजातील जातीव्यवस्था ही समाजाच्या अधोगतीला कारणीभूत झालेली आहे असे त्यांचे मत होते. म्हणून त्यांचा जातीव्यवस्था, वर्णभेद याला विरोध होता. उच्चवर्णीयांनी आपल्या वर्णश्रेष्ठत्वाच्या कल्पनांचा त्याग करून देशहितासाठी नव्या आचार विचारांचा अंगीकार करावा असे त्यांनी म्हटले होते
२. (१८३६) महान संत, अध्यात्मिक गुरू रामकृष्ण परमहंस यांचा जन्म
स्वामी विवेकानंद हे रामकृष्ण परमहंसांचे प्रमुख शिष्य होते. आधुनिक भारतीय धर्मप्रबोधनात त्यांनी कामगिरी बजावली. ग्रामीण बंगाली भाषेतील त्यांच्या छोट्या छोट्या कथांचा तेथील जनतेवर बराच प्रभाव पडला. त्यामुळे रूढार्थाने अशिक्षित असतानाही रामकृष्ण बंगाली विद्बज्जन समाजाचे व शिक्षित मध्यमवर्गाचे लक्ष वेधण्यास यशस्वी ठरले. १८७० च्या दशकाच्या मध्यापासून पाश्चात्य शिक्षण घेतलेल्या बुद्धिजीवींवर त्यांचा प्रभाव पडला व नंतर ते बंगालमधील प्रबोधनाचे उद्गाते ठरले
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment