दिनविशेष १६ फेब्रुवारी
दिनविशेष
दि. १६ फेब्रुवारी
◆ जन्म
१. (१८७६) भारतातील पहिले सीनियर रँग्लर आणि फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे उर्फ रॅंग्लर परांजपे यांचा जन्म
ते केंब्रिज विद्यापीठाचा वरिष्ठ रॅग्लर हा किताब पटकावणारे पहिले भारतीय. ते पेशाने गणिताचे प्राध्यापक होते. आपल्या यशस्वी कारकिर्दीत त्यांनी काही विद्यापीठांचे कुलगुरुपद, तसेच ऑस्ट्रेलियात ब्रिटिश भारताच्या वकिलातीतील उच्चायुक्तपदही भूषवले. रॅंग्लर परांजपे अंधश्रद्धेचे विरोधक म्हणून ओळखले जात
● निधन
१. (१९४४) भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक धुंडिराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके यांचे निधन
चित्रपटनिर्मिती करणारे ते महाराष्ट्रातील व भारतातील पहिली व्यक्ती होते. यासाठीच त्यांना भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक मानले जाते. १९१३ साली त्यांनी निर्माण केलेला 'राजा हरिश्चंद्र' हा मूक चित्रपट मराठी व भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील पहिला चित्रपट होय
२. (२०१५) महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे निधन
ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य, महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री होते. ते लोकांमध्ये स्वच्छ चारित्र्याचे व प्रामाणिक नेते म्हणून प्रसिद्ध होते
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment