दिनविशेष १२ फेब्रुवारी

दिनविशेष

दि. १२ फेब्रुवारी

◆ जन्म 

१. (१८०९) उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन यांचा जन्म

२. (१८०९) अमेरिकेचे १६ वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचा जन्म

गुलामगिरीच्या विळख्यातून अमेरिकी जनतेला मुक्त करणाऱ्या या महान नेत्याचा लढा जितका प्रखर, तितकाच प्रेरणादायीसुद्धा आहे

३. (१८२४) आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म

४. (१९२०) यारी है इमान मेरा यार मेरी जिंदगी... मैत्रीची साधी व्याख्या सांगणारे, जास्त प्रमाणात निगेटिव्ह भूमिका करूनही पॉजिटिव्ह छाप सोडणारे चित्रपट अभिनेते प्राण कृष्ण सिकंद ऊर्फ प्राण यांचा जन्म

ते हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते होते. त्यांनी भारतीय चित्रपटसुष्टीत ७० हून अधिक वर्षे घालवून ४०० हून अधिक चित्रपटांत अभिनय केला. खलनायक म्हणून त्यांच्या भूमिका गाजल्या असल्या तरी त्यांनी इतरही प्रकारच्या भूमिका केल्या त्याही तेवढ्याच गाजल्या

● निधन

१. (१७९४) मल्हाराव होळकरांच्या साथीने उत्तरेत मराठ्यांचा दबदबा निर्माण करणारे थोर सेनानी, मराठा साम्राज्यातील मुत्सद्दी महादजी शिंदे यांचे येथे निधन

२. (२००१) अभिनेत्री भक्ती बर्वे-इनामदार यांचे निधन

'ती फुलराणी' या नाटकात त्यांनी प्रमुख भूमिका केली. 'आई रिटायर होतेय' या नाटकातील त्यांनी साकारलेली आईची भूमिका खूप गाजली. १९९० मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

३. (२०२२) बजाज ग्रुप चे माजी चेअरमन, उद्योजक पद्मभूषण राहुल बजाज यांचे निधन

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर