दिनविशेष ०२ फेब्रुवारी

दिनविशेष

दि. ०२ फेब्रुवारी

◆ जन्म 

१. (१८८४) ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांचा जन्म

ते मराठीतील आद्य महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे जनक-संपादक, समाजशास्त्रज्ञ, कादंबरीकार, इतिहास संशोधक व विचारवंत होते. महाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या कार्यामुळे ज्ञानकोशकार केतकर या नावानेही ते ओळखले जातात

२. (१९२६) आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पत्नी स्व. वेणूताई चव्हाण यांचा जन्म

त्यांच्यावर लहानपणापासून देशभक्तीचे संस्कार झाले होते. त्यांना देशभक्ती, स्वातंत्र्य चळवळ या गोष्टीचा आदर होता, त्यामुळे त्यांनी लग्न करेन तर देशभक्तीसाठी वेड्या झालेल्या तरुणाशी, असा निश्चय केला होता. यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या देशभक्त तरुणाशी लग्न करून त्यांनी तो निश्चय सत्यात उतरवला

यशवंतरावांच्या सरकारी कामांत, राजकारणात वेणूताई कधी लक्ष देत नसत. यशवंतरावही वेणूताईंच्या कौटुंबिक व्यापांत अजिबात लक्ष घालत नसत. त्यांच्याविषयीच्या अनेक आठवणी अभ्यासकांनी नोंदवून ठेवल्या आहेत

यशवंतराव चव्हाण आणि वेणूताई यांच्यामधील पत्रव्यवहार हा तर मराठी भाषेतील एक अस्सल सहित्यप्रकार म्हणून पाहिला जातो. या पत्रातील भाषा आणि उभयतांमधील चर्चा सुद्धा वाचकांना समृद्ध करते

● निधन

१. (१९७०) ब्रिटिश गणितज्ञ, तत्त्वज्ञ आणि इतिहासकार बर्ट्रांड रसेल यांचे निधन

ते एक ब्रिटिश लेखक, तत्त्वज्ञ, इतिहासकार व गणितज्ञ होते. विसाव्या शतकामधील एक आघाडीचे तत्त्वज्ञ मानल्या जाणाऱ्या रसेल यांना १९५० सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते. रसेल जगामधील प्रतिष्ठित शांतीपुरस्कर्त्या व्यक्तींपैकी एक होते. त्यांनी पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध, व्हियेतनाम युद्ध इत्यादी जागतिक युद्धांवर टीका केली होती तसेच त्यांचा अण्वस्त्र बंदीला पाठिंबा होता

२. (२०२२) आपल्या दमदार अभिनयाने हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीला समृद्ध करणारे ज्येष्ठ अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक रमेश देव यांचे निधन

त्यांनी अनेक मराठी व हिंदी चित्रपटांतून अभिनय केला आहे. त्यांनी त्यांच्या दीर्घ कारकिर्दीत २०० हून अधिक प्रदर्शनांसह २८५ हून अधिक हिंदी चित्रपट, १९० मराठी चित्रपट आणि ३० मराठी नाटकांमध्ये काम केले. त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट, दूरदर्शन मालिका आणि २५० हून अधिक जाहिरात चित्रपटांची निर्मिती केली. त्यांनी अनेक चित्रपट, माहितीपट आणि दूरदर्शन मालिकाही दिग्दर्शित केल्या. त्यांच्या कार्यासाठी त्यांना अनेक राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळाले

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर