दिनविशेष ०७ जानेवारी

दिनविशेष

दि. ०७ जानेवारी

◆ जन्म 

१. (१९२०) लोकसाहित्याच्या अभ्यासक, लेखिका सरोजिनी बाबर यांचा जन्म

त्या लोककला व लोकसंस्कृती या विषयांवर लिहिणाऱ्या नावाजलेल्या मराठी लेखिका होत्या. स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी भाग घेतला होता. त्यांनी महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा अभ्यास, लोकसाहित्याचे संशोधन, संपादन आणि संकलन इत्यादी कामे त्यांनी पार पाडली. सरोजिनी बाबर या महाराष्ट्र विधानसभा (१९५२-५७), महाराष्ट्र विधानपरिषद (१९६४-६६) व भारतीय राज्यसभा (१९६८-१९७४) या सभागृहांच्या सदस्या होत्या

महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीच्या त्या अध्यक्षा होत्या. त्यांनी दुर्मीळ आणि अप्रकाशित लोकसाहित्य संकलित केले आणि ’लोकसाहित्य शब्दकोश’ आणि ’भाषा व संस्कृती’ या पुस्तकांमधून प्रकाशित केले. 'समाज-शिक्षण माला' हे मासिक त्यांनी अनेक वर्षे चालवले. लोकसाहित्य समितीच्या अध्यक्षा म्हणून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातल्या लोकवाडमयाचा प्रचंड संग्रह त्यानी केला

२. (१९४८) भारतीय लेखिका शोभा डे यांचा जन्म

त्या एक भारतीय कादंबरीकार आणि स्तंभलेखक आहेत. त्या काल्पनिक साहित्यामधील सोशलाइट्स चित्रणासाठी प्रसिद्ध आहेत. थेट, मामिर्क आणि पारदर्शी लेखन हे त्यांच्या स्तंभांचे वैशिष्ट्य मानले जाते. अनेक पुस्तके त्यांनी लिहीली आहेत. त्यात स्टारी नाईटस, सिस्टर्स, सिलेक्टिव्ह मेमरीज, सर्व्हायविंग मेन, स्पीडपोस्ट, स्पाउस - द ट्रूथ अबाऊट मॅरेज आणि सुपरस्टार इंडिया- फ्रॉम इनक्रेडिबल टू अनस्टॉपेबल या पुस्तकांचा समावेश आहे

३. (१९४८) कोल्हापूर संस्थानचे सद्यस्थितीत असलेले छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म

त्यांनी राजकीय, सामाजिक क्षेत्रात अनेक वर्षे काम केले आहे

४. (१९६७) जागतिक व भारतीय चित्रपटसृष्टीतील अभिनेते इरफान खान यांचा जन्म

त्यांनी हिंदी चित्रपट, तसेच ब्रिटिश आणि अमेरिकन चित्रपटांमध्ये काम केले. त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हणून नावाजले गेले

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर