दिनविशेष ०६ जानेवारी

दिनविशेष

दि. ०६ जानेवारी

■ दिनविशेष 

१. पत्रकार दिन

पत्रकार दिन हा ६ जानेवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो. महाराष्ट्र राज्यात हा दिन साजरा केला जातो. बाळशास्त्री जांभेकर यांनी इंग्रजी व मराठीतील पहिले साप्ताहिक वृत्तपत्र दर्पण ६ जानेवारी १८३२ साली सुरू केले

◆ जन्म 

१. (१८१२) मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म

२. (१९२७) प्रवासवर्णनकार, कथाकार आणि विनोदी लेखक रमेश मंत्री यांचा जन्म

रमेश मंत्री हे मराठी लेखक होते. त्यांनी प्रामुख्याने विनोदी लेखन मोठ्या प्रमाणात केले आहे

३. (१९२८) प्रसिद्ध नाटककार, साहित्यिक, पटकथा लेखक व राजकीय विश्लेषक विजय तेंडुलकर यांचा जन्म

सुरुवातीच्या नाटकांपासूनच माणसाच्या जीवनाचा, त्यांच्या विकारांचा, एकारलेपणाचा वेध घेण्याचा त्यांचा प्रयत्‍न दिसतो. विशिष्ट तत्त्वज्ञानाचा, विचारसरणीचा ठसा नाकारून तेंडुलकर मनस्वीपणे लिहीत गेले. 'शांतता! कोर्ट चालू आहे' यासारख्या नाटकातून समाजाला प्रसंगी बंडखोर वाटणाऱ्या विषयांनाही त्यांच्या लेखणीने हात घातला. 'सखाराम बाईंडर' मध्ये हाताळलेला स्फोटक विषय आणि 'घाशीराम कोतवाल' मध्ये हाताळलेला पारंपरिक तंत्राला धक्का देणारा नाट्यबंध त्यांच्या याच प्रयोगशील जाणिवांचा अविभाज्य भाग होता. त्यामुळेच नव्या-जुन्या कलावंतांना तेंडुलकरांनी लिहिलेल्या नाटकांचे आव्हान पेलण्याची ओढ सातत्याने राहिली. रंगभूमीचा चेहरामोहरा बदलण्यात त्यांचं मोठं योगदान आहे. त्यांनी जवळपास ४० नाटके, ७० ते ७५ एकांकिका, पटकथा, कथा, कादंबऱ्या लिहिल्या

४. (१९५९) भारतीय क्रिकेट खेळाडू कपिल देव यांचा जन्म 

त्यांच्याच नेत्रुत्वात भारताने इंग्लंड मध्ये आपला पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकला होता

● निधन

१. (१८८५) आधुनिक हिंदी साहित्याचे जनक भारतेंदू हरीश्चंद यांचे निधन

हिंदीतील परखडतेचे जनक भारतेंदू हरिश्चंद्र यांचे भाषेचा विकास आणि सर्व विधींना समृद्ध करण्यात मोठे योगदान आहे. ते सत्यवादी होते

२. (१९७१) भारतीय जादुगार पी. सी. सरकार यांचे निधन

पी. सी. सरकार यांनी सुमारे ७० देशांत जादूचे प्रयोग केले. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय दूरचित्रवाणी वाहिन्यांवर त्यांचे कार्यक्रम अनेकदा प्रसारित झाले. काहीशा हीन लेखल्या गेलेल्या आणि दीर्घकाळ दुर्लक्षित राहिलेल्या जादू कलेला सरकार यांनी भारताबरोबरच जगभर प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यामुळे ‘भारतीय जादूकलेचे पितामह’ असा त्यांचा सार्थ उल्लेख केला जातो

३. (२०१७) भारतीय अभिनेते ओम पुरी यांचे निधन

ते एक भारतीय अभिनेते होते. त्यांनी अनेक हिंदी तसेच ब्रिटिश, अमेरिकन, पाकिस्तानी चित्रपटांमध्ये काम केले. त्यांना १९९० साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ओम पुरी यांच्या कारकिर्दीची सुरुवात १९७६ साली घाशीराम कोतवाल या मराठी चित्रपटाने झाली. अर्ध सत्य (१९८२) या चित्रपटामध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेसठी त्यांना सर्वोत्तम अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्याचबरोबर त्यांना आणखी एक राष्ट्रीय पुरस्कार, दोन फिल्मफेर पुरस्कार, एक जीवन गौरव पुरस्कार मिळाले आहेत. ओम पुरी यांनी सुमारे ३०० चित्रपटांत भूमिका केल्या आहेत

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर