दिनविशेष ०५ जानेवारी
दिनविशेष
दि. ०५ जानेवारी
■ दिनविशेष
१. राष्ट्रीय पक्षी दिन
दरवर्षी ५ जानेवारी हा राष्ट्रीय पक्षी दिन म्हणून साजरा केला जातो. अनेक पक्ष्यांना आर्थिक लाभ आणि आनंदासाठी पकडले जाते, त्यांना पिंजऱ्यात बंदिस्त केले जाते, वाईट वागणूक दिली जाते, तसेच पैशासाठी विकले जाते. याबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय पक्षी दिन साजरा केला जातो. पक्षी किंवा प्राण्यांना पिंजऱ्यात अडकवून ठेवणे, कैद करणे बेकायदेशीर आणि नैतिकदृष्ट्या चुकीचे आहे. त्यांना चांगले जीवन मिळावे यासाठी आपण काम केले पाहिजे
◆ जन्म
१. (१९१३) मराठी साहित्यिक श्रीपाद नारायण पेंडसे यांचा जन्म
कादंबरी, कथा, नाटक, व्यक्तिचित्रण, आत्मचरित्र अशा विविध वाड्मयप्रकारांत लेखन केलेल्या पेंडसेंची मराठी साहित्यात ओळख आहे ती कादंबरीकार म्हणूनच श्री ना पेंडसे यांची ‘जीवनकला’ ही पहिली कथा १९३८ मधे प्रसिद्ध झाली. नंतर काही व्यक्तिचित्रे त्यांनी लिहिली. ‘खडकावरील हिरवळ’ हे त्यांचे व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक १९४१ साली प्रकाशित झाले. हे त्यांचे प्रकाशित झालेले पहिले आणि शेवटचे व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक होय
२. (१९२२) आपल्या अभिनयाद्वारे पाच दशके प्रेक्षकांना खळाळून हसवणारे विनोदी कलाकार व चरित्र अभिनेते मोहम्मद उमर मुक्री यांचा जन्म
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment