दिनविशेष ०१ फेब्रुवारी
दिनविशेष
दि. ०१ फेब्रुवारी
■ दिनविशेष
१. भारतीय तटरक्षक दिन
भारतीय तटरक्षक दिन १ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. १ फेब्रुवारी १९७७ रोजी स्थापन झालेले, भारतीय तटरक्षक दल भारताच्या विशाल किनारपट्टी आणि सागरी क्षेत्रांची सुरक्षा सुनिश्चित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते
सागरी पर्यावरणाचे रक्षण करणे हा भारतीय तटरक्षक दलाच्या जबाबदाऱ्यांचा एक महत्त्वाचा पैलू आहे. ते तेल गळतीला प्रतिसाद देतात, प्रदूषण नियंत्रण उपाय करतात आणि समुद्रांचे पर्यावरणीय संतुलन सुनिश्चित करण्यासाठी इतर एजन्सीशी सहयोग करतात
◆ जन्म
१. (१९१२) संपादक, चित्रपट अभिनेते, लेखक, नाटककार, कादंबरीकार, कथाकथनकार, गायक, कवी आणि गीतकार राजा बढे यांचा जन्म
त्यांना सुरुवातीला नागपूरमध्ये कवी म्हणून प्रसिद्धी मिळाली. नंतर ते मुंबईत आले. सन १९५६ ते १९६२ या काळात ते मुंबई आकाशवाणीवर सुगम संगीत विभागाचे प्रोड्यूसर होते. त्यांनी शिवाजी राजांवर एक चित्रपट निर्माण केला. 'जय जय महाराष्ट्र माझा' हे शाहीर साबळे यांनी गायलेले गीत राज बढे यांनी लिहले होते
२. (१९१७) चित्रपट अभिनेते व स्वातंत्र्यसैनिक ए. के. हनगल यांचा जन्म
ते हिंदी चित्रपटांमधील एक प्रसिद्ध चरित्र अभिनेते होते. हंगल यांनी २०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'नमक हराम', 'शोले', 'शौकीन', 'आइना' असे अनेक त्यांचे चित्रपट प्रसिद्ध आहेत. इतना सन्नाटा क्यों है भाई?, या संवादातून शोलेमधील रहीम चाचाची त्यांची भूमिका अजरामर झाली
३. (१९२७) ज्येष्ठ मराठी समीक्षक मधुकर दत्तात्रय तथा म. द. हातकणंगलेकर यांचा जन्म
प्रामुख्याने समीक्षा, ललित लेखन, अनुवाद व संपादने असे विविध स्वरूपाचे वाङ्मयीन कार्य त्यांनी केले. साहित्यातील अधोरेखिते (१९८०), मराठी कथा : रूप आणि परिसर (१९८६), साहित्यविवेक (१९९७) व भाषणे आणि परीक्षणे (२००३) ही त्यांची महत्त्वपूर्ण साहित्यसमीक्षापर पुस्तके होत. पाश्चात्त्य वाङ्मय व समीक्षा यांच्या चौफेर व्यासंगातून त्यांची समीक्षा डोळस, संयत व व्यापक झाली आहे. त्यांनी सौंदर्यशास्त्रीय तसेच तात्त्विक, सैद्धांतिक स्वरूपाचे काही समीक्षालेखन केले असले, तरी त्यांची ख्याती मुख्यत्वे स्वागतशील वृत्तीचे आस्वादक समीक्षक म्हणून आहे. आस्वादक समीक्षेचा मानदंड त्यांनी मराठीत निर्माण केला. समकालीन साहित्यातील नवनवे प्रवाह, नव्या पिढीतील गुणवान प्रतिभावंत लेखक व त्यांच्या महत्त्वपूर्ण साहित्यकृती यांविषयी त्यांनी आत्मीयतेने व गुणग्राहक वृत्तीने सातत्याने लिहिले आहे. त्यांची समीक्षा जशी स्वागतशील व आस्वादक आहे, तशीच ती सूक्ष्म, सखोल चिकित्सक व विश्लेषणात्मक स्वरूपाची आणि साक्षेपी व समतोल वृत्तीची निदर्शकही आहे
● निधन
१. (१९९५) नाटककार, चित्रपट दिग्दर्शक व पत्रकार मोतीराम गजानन तथा मो. ग. रांगणेकर यांचे निधन
ते मराठी नाटककार, चित्रपट-दिग्दर्शक, पत्रकार होते. यांनी लिहिलेली कुलवधू, आशीर्वाद, नंदनवन, माझे घर, वहिनी इत्यादी नाटके विशेष गाजली. नाट्यविषयक योगदानासाठी इ.स. १९८२ सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार देऊन यांना गौरवण्यात आले
२. (२००३) भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर कल्पना चावला यांचे निधन
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment