दिनविशेष ३१ जानेवारी
दिनविशेष
दि. ३१ जानेवारी
★ घटना
१. (१९२०) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूकनायक या पाक्षिकाची सुरूवात
मूकनायक हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इ.स. १९२० साली समाजाच्या वेदना व विद्रोह प्रकट करण्यासाठी सुरू केलेले मराठी भाषेतील एक पाक्षिक होते. ३१ जानेवारी १९२० रोजी या पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित करण्यात आला. हे पाक्षिक मुंबईहून निघत असे. शाहू महाराज यांनी हे पाक्षिक सुरू करण्यासाठी मदत केली होती. दीन-दुबळ्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचविणे हा या वृत्तपत्राचा उद्देश होता
● निधन
१. (२०००) मराठी नाटककार वसंत कानेटकर यांचे निधन
कानेटकरांनी ४३ नाटके व ४ कादंबऱ्या लिहिल्या. त्यांची नाटके व्यावसायिकदृष्ट्या खूप यशस्वी झाली. अश्रूंची झाली फुले हे त्यातीलच एक प्रसिद्ध नाटक होय
२. (२००४) प्रसिद्ध व्हायोलिनवादक पं. व्ही. जी. जोग यांचे निधन
जुगलबंदी वादक म्हणून ते चांगले गाजले. बिस्मिल्ला खॉं यांच्या बरोबरच्या त्यांच्या गजली फार गाजल्या
३. (२००४) अभिनेत्री व गायिका सुरैय्या यांचे निधन
त्यांनी १९४० आणि १९५० च्या दशकांत अभिनय व गायन केले. त्या ऑल इंडिया रेडिओत लहान मुलांच्या कार्यक्रमात गात
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment