दिनविशेष २८ जानेवारी

दिनविशेष

दि. २८ जानेवारी

◆ जन्म 

१. (१८६५) स्वातंत्र्यसेनानी पंजाब केसरी तथा लाला लजपतराय यांचा जन्म

ते पंजाबी, भारतीय राजकारणी व लेखक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी योगदान दिले. त्यांना पंजाब केसरी असे म्हणतात. त्यांनी पंजाब नॅशनल बँकेची स्थापना केली

२. (१८९९) स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख फील्डमार्शल के. एम. करिअप्पा यांचा जन्म

1947 च्या भारत-पाकिस्तान युद्धात त्यांनी पश्चिमी मोर्चेवर भारतीय सेनेचे नेतृत्व केले होते. 15 जानेवारी, 1949 रोजी त्यांनी तत्कालीन ब्रिटिश जनरल सर रॉय बुचर यांच्याकडून लष्कराचे पहिले भारतीय कमांडर-इन-चीफ म्हणून सूत्रे स्वीकारली होती. त्यांना राष्ट्रासाठी केलेल्या सेवेची ओळख म्हणून 28 एप्रिल, 1986 रोजी भारत सरकारने त्यांना फील्ड मार्शल ही पदवी दिली

३. (१९३७) चित्रपट व भावगीत गायिका सुमन शंकर हेमाडी तथा सुमन कल्याणपूर यांचा जन्म

या गायिका असून त्यांनी हिंदी, मराठी चित्रपटगीतांबरोबरच अनेक मराठी भावगीतेही गायली आहेत. गुजराती, बंगाली, पंजाबी, ओडिसी या भाषांतही त्यांनी गाणी गायिलेली आहेत

● निधन

१. (१९९७) आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संख्याशास्त्रज्ञ व आहारतज्ञ डॉ. पांडुरंग वासुदेव तथा पां. वा. सुखात्मे यांचे निधन

ते प्रसिद्ध गणिती शास्त्रज्ञ होते. 'इंडियन ॲग्रिकल्चरल स्टॅटिस्टिक्स रिसर्च इन्स्टिट्यूट' या संस्थेच्या स्थापनेत त्यांचा मोलाचा हातभार होता

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर