दिनविशेष २६ जानेवारी

दिनविशेष

दि. २६ जानेवारी

■ दिनविशेष 

१. प्रजासत्ताक दिन

२६ जानेवारी हा दिवस दरवर्षी देशात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. २६ जानेवारी १९५० रोजी संविधान लागू होऊन भारताला प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. राज्यघटनेचा स्वीकार करण्यापूर्वी दोन वर्षे, ११ महिने आणि १८ दिवस सार्वजनिक अधिवेशनांमध्ये विधानसभेची १६६ दिवस बैठक झाली. २४ जानेवारी १९५० रोजी विधानसभेच्या ३०८ सदस्यांनी दस्तावेजाच्या दोन हस्तलिखित प्रतींवर स्वाक्षरी केली. याच्या दोन दिवसांनंतर म्हणजे २६ जानेवारी १९५० रोजी राज्यघटना देशभर लागू झाली. नवीन संविधानाच्या तरतुदींनुसार संविधान सभा, भारताची संसद बनली

★ घटना

१. (१९७८) महाराष्ट्रात रोजगार हमी कायदा सुरू झाला

सन १९७२ मध्ये पडलेल्या दुष्काळाच्या संकटावर मात करून लोकांच्या हातांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांनी ही योजना आकारास आणली. रोजगार हमी योजनाची पायाभरणी वसंतराव नाईक यांनी केले, त्यामुळे त्यांना रोजगार हमी योजनाचे जनक मानले जाते. रोजगार नसलेल्यांसाठी वर्षातले किमान ठराविक दिवस रोजगाराची हमी देणारी ही योजना रोजगार हमी योजना म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या आणि प्रभावीपणे चालविलेल्या योजनांपैकी ही एक योजना आहे. या योजनेसाठी नोंदणी केलेल्यांना वर्षात एक ठराविक दिवस रोजगारासाठी कामे दिली जातात. त्याबदल्यात रोख रक्कम आणि अन्नधान्य अशा स्वरूपात रोजगार दिला जातो

अलिकडेच, याच धर्तीवर भारताच्या केंद्रसरकारने सर्व देशासाठी महाराष्ट्रात पायाभरणी झालेल्या या योजनेला केंद्र स्तरावर स्विकारून राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (एनआरईजीए) करून तो पूर्ण देशासाठी तो लागू केला. महाराष्टातील १५ कलमी कार्यक्रमाअन्वये २८ मार्च १९७२ ला ही योजना सुरू करण्यात आली.वरील योजनेला पाठबळ देण्यासाठी १९७७ मध्ये राज्याने महाराष्ट्र रोजगार हमी योजना कायदा १९७७ संमत केला

 ● निधन

१. (१९५४) देशभक्त, क्रांतिकारक व भारतातील कम्यूनिस्ट पक्षाचे संस्थापक मानवेंद्रनाथ रॉय यांचे निधन

ते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बंगाली-भारतीय साम्यवादी नेते व तत्त्वज्ञ होते. १९३४ ला सर्वप्रथम संविधान सभेची संकल्पना त्यांनी मांडली

२. (१९६८) लोकनायक माधव श्रीहरी तथा बापूजी अणे यांचे निधन

ते एक शिक्षणतज्ज्ञ, स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी आणि आधुनिक संस्कृत कवी होते. त्यांना 'लोकनायक बापूजी' म्हणजे 'लोकनेते आणि आदरणीय पिता' ही पदवी देखील बहाल करण्यात आली होती
 
३. (२०१५) व्यंगचित्रकार रासीपुरम कृष्णस्वामी तथा आर. के. लक्ष्मण यांचे निधन

ते एक भारतीय व्यंगचित्रकार, चित्रकार आणि विनोदी लेखक होते. आर. के. लक्ष्मण या नावाने ते ओळखले जात. ते त्यांच्या 'द कॉमन मॅन'च्या निर्मितीसाठी आणि १९५१ मध्ये सुरू झालेल्या टाइम्स ऑफ इंडियातील 'यू सेड इट' या त्यांच्या दैनिक व्यंगचित्रांसाठी अत्यंत प्रसिद्ध होते

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर