दिनविशेष २३ जानेवारी

दिनविशेष

दि. २३ जानेवारी 

◆ जन्म 

१. (१८९७) नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म

भारतीय राष्ट्रवादी सुभाषचंद्र बोस यांच्या देशभक्तीने अनेक भारतीयांवर कायमची छाप सोडली आहे. ते 'आझाद हिंद फौज' या संघटनेची स्थापना करण्यासाठी प्रसिद्ध आहेत आणि 'तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आझादी दुंगा' अशी घोषणा त्यांनी दिली होती

२. (१९२०) व्यासंगी लेखक श्रीपाद रघुनाथ जोशी यांचा जन्म

जोशी यांनी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली झालेल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. त्याबद्दल त्यांना ब्रिटिश सरकारने ठोठावलेल्या शिक्षेमुळे १९४२ ते १९४४ या काळात येरवडा तुरुंंगात कारावास भोगावा लागला. महात्मा गांधींशी त्यांचा व्यक्तिगत पत्रव्यवहार होता

जोशींनी हिंदी-मराठीत विविध विषयांवरील सुमारे १९४ पुस्तके लिहिली. त्यांपैकी किमान सात महात्मा गांधींच्या आयुष्याच्या विविध अंगांबद्दल होती, तर एक मुसलमानी संस्कृतीबद्दल होते. याशिवाय जोशींनी लिहिलेल्या प्रवासवर्णनाचे ७ खंड आहेत. त्यांनी काही उर्दू काव्याचे मराठी भाषांतरही केले

३. (१९२६) महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय नेते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म

ते महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक, राजकारणी व व्यंगचित्रकार होते. सामना या मराठी दैनिकाचे ते संस्थापक, तसेच प्रमुख संपादकही होते

● निधन

१. (१६६४) छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील स्वराज्यसंकल्पक शहाजी राजे भोसले यांचे निधन

शहाजीराजे भोसले हे पराक्रमी, युद्धप्रसंगीची बुद्धिमत्ता, उत्तम प्रशासन, व स्वतंत्र राज्यकारभार या मूलभूत गुण-कौशल्य असलेले ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व होते

२.  (१९१९) नाटककार, कवी व विनोदी लेखक राम गणेश गडकरी यांचे निधन

गोविंदाग्रज ह्या टोपणनावाने त्यांनी सुमारे १५० कविता लिहिल्या, आणि बाळकराम ह्या टोपणनावाने काही विनोदी लेख लिहिले. ह्या साहित्याच्या जोडीला 'एकच प्याला', 'प्रेमसंन्यास', 'पुण्यप्रभाव', आणि 'भावबंधन' ही चार पूर्ण नाटके (आणि 'राजसंन्यास' आणि 'वेड्यांचा बाजार' ही दोन अपुरी राहिलेली नाटके) लिहिली

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर