दिनविशेष २० जानेवारी

दिनविशेष

दि. २० जानेवारी

◆ जन्म 

१. (१८६१) मराठीतील पहिल्या स्त्री कथा-कादंबरीकार, निबंधकार आणि सुधारक काशीबाई गोविंदराव कानिटकर यांचा जन्म

मराठी भाषेतील लेखिका व स्त्रीवादी समाजसुधारक होत्या. मराठी समाजात व स्थूलमानाने भारतीय समाजात स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाविषयी त्यांनी आपल्या साहित्याद्वारे आवाज उठवला

काशीबाई बनारस हिंदू विश्वविद्यालयात मराठी भाषा विषय शिकवीत असत. काशीबाई इ.स. १९१० च्या भारतीय राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनास हजर होत्या

२. (१८९८) गायक कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर ऊर्फ मास्टर कृष्णराव ('मास्तर कृष्णराव') यांचा जन्म

ते हिंदुस्तानी संगीत पद्धतीतील गायक व मराठी संगीत नाटकांमधील संगीतकार आणि गायक-अभिनेते होते. गायनाचार्य भास्करबुवा बखल्यांचे ते पट्टशिष्य होते. पुणे भारत गायन समाजाचे अध्यक्ष व सात भागांचे सरकारमान्य रागसंग्रहमाला लेखन, सुलभ संगीत व्याकरण पद्धतीचे निर्माते, स्वतंत्र संगीतरचना, अनवट राग, जोड राग व बंदीशींचे निर्माणकर्ते. वंदे मातरम् हे राष्ट्रगीत होण्याकरिता प्रखर सांगीतिक लढा दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विनंतीनुसार बुद्धवंदना भारतात सर्वप्रथम संगीतबद्ध केली

गुरुवर्य बखलेबुवांच्या आग्रहास्तव मास्तर कृष्णरावांनी १९१६ साली गंधर्व नाटक मंडळींत प्रवेश केला. ते बालगंधर्वांबरोबर मुख्य भूमिका करत असत. ह्या दरम्यान त्यांनी 'संगीत शारदा', 'संगीत सौभद्र', 'एकच प्याला' यांसारख्या अनेक संगीत नाटकांत काही पुरुष (गायक नट) भूमिका आणि बऱ्याच स्त्री (गायक नट) भूमिकाही केल्या

● निधन

१. (१९५१) समाजसेवक अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर ऊर्फ ठक्कर बाप्पा यांचे निधन

ठक्कर बापा यांनी आपले संपूर्ण आयुष्य दलित शोषित समाजासाठी वाहले होते. त्यांच्यावर महात्मा गांधींजींच्या विचारांचा पगडा होता. ते गांधीजींचे अनुयायीही होते. १९१५-१६ मध्ये ठक्कर बापांनी मुंबईतील सफाई कामगारांसाठी सहकारी संस्था स्थापन केली. तसेच अहमदाबाद येथे मजुरांच्या मुलांसाठी शाळा उघडली. 'भिल सेवा मंडळ' स्थापन केले

२. (१९८८) स्वातंत्र्यसैनिक आणि पश्तून नेते खान अब्दुल गफार खान उर्फ सरहद्द गांधी यांचे निधन

सरहद्द गांधी व बादशाह खान या नावाने ते प्रसिद्ध होते. ते वायव्य सरहद्द प्रांतातील स्वातंत्र्यसेनानी होते. ज्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये भाग घेतला होता. भारतरत्न पुरस्कार मिळालेले ते पहिले अभारतीय होते. गफार खान यांनी १९२९ मध्ये 'खुदाई खिदमतगार' ही संघटना उभारली होती. या संघटनेच्या सदस्यांना 'लाल डगले वाले' म्हणून ओळखतात. ही संघटना 'सुर्ख पोश' या नावाने देखील ओळखली जात होती

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर