दिनविशेष १५ जानेवारी

दिनविशेष

दि. १५ जानेवारी

■ दिनविशेष 

१. भारतीय लष्कर दिन

भारतीय लष्कर दिन दरवर्षी १५ जानेवारीला साजरा केला जातो. भारतीय लष्कर सेना नेहमीच देशाच्या सुरक्षेसाठी नेहमीच कटिबद्ध असते. एखादे युद्ध असो, देशातील मोठ्या दुर्घटनेनंतर बचावकार्य असो किंवा आपात्कालीन परिस्थितीत गरजू लोकांना लवकरात लवकर मदत करणे असो, आपले भारतीय सैनिक सर्वत्र तत्परतेने काम करतात

भारतीय लष्कराची स्थापना ब्रिटीश साम्राज्यात झाली होती. या काळात लष्करातील वरिष्ठ अधिकारी ब्रिटिश असायचे. भारत स्वतंत्र झाल्यानंतरही लष्करात ब्रिटिश वंशाचे वरिष्ठ अधिकारी होते. १९४९ मध्ये जनरल फ्रान्सिस बुचर हे शेवटचे ब्रिटिश कमांडर होते. त्यांच्या जाण्यानंतर लेफ्टनंट जनरल के एम करिअप्पा हे स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय लष्करी अधिकारी बनले

१५ जानेवारीलाच केएम करिअप्पा यांनी जनरल फ्रान्सिस बुचर यांच्याकडून भारतीय लष्कराची धुरा हातात घेतली. भारतीय लष्करासाठी हा अत्यंत खास क्षण होता. या दिवशी प्रथमच देशाच्या लष्कराचे नेतृत्व एका भारतीयाच्या हाती आले. याच कारणांमुळे दरवर्षी १५ जानेवारी रोजी भारतीय लष्कर दिन साजरा केला जातो

★ घटना 

१. विकिपीडिया दिन

(२००१) विकिपीडिया हा मुक्त ज्ञानकोश प्रथमच इंटरनेटवर उपलब्ध करून देण्यात आला

विकिपीडिया दिन दरवर्षी 15 जानेवारी रोजी साजरा केला जातो. 2001 साली जिमी वेल्स आणि लॅरी सॅंगर यांनी विकिपीडियाची स्थापना केली. हा दिवस जगातील सर्वात मोठ्या मुक्त ज्ञानकोशाच्या स्थापना दिवसाचा सन्मान करण्यासाठी समर्पित आहे

विकिपीडिया ही एक डिजिटल प्लॅटफॉर्म असून जगभरातील लोकांना विविध विषयांवरील माहिती उपलब्ध करून देते. याचे वैशिष्ट्य म्हणजे लोक स्वतःच यात लेख संपादित आणि अद्ययावत करू शकतात. यामुळेच विकिपीडिया ज्ञानाचा एक मुक्त स्त्रोत बनला आहे

आज विकिपीडिया 300 पेक्षा अधिक भाषांमध्ये उपलब्ध आहे आणि जगभरातील कोट्यवधी लोक या ज्ञानकोशाचा उपयोग करतात. शिक्षण, संशोधन, आणि माहितीची देवाणघेवाण यासाठी विकिपीडियाचा उपयोग अमूल्य ठरतो

विकिपीडिया दिन आपल्याला ज्ञानाच्या मुक्त प्रवाहाचे महत्त्व पटवून देतो. यामुळे जगातील प्रत्येकाला शिक्षण आणि माहितीचा सहज आणि विनामूल्य प्रवेश मिळतो, ज्यामुळे जागतिक पातळीवर समृद्ध समाजाची निर्मिती होते

◆ जन्म

१. (१९२१) महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांचा जन्म

२. (१९२६) सातारा (कराड) चे सुपुत्र, भारतातील पहिले वैयक्तिक ऑलिंपिक पदक विजेते कुस्तीपट्टू खाशाबा जाधव यांचा जन्म

ते एक भारतीय फ्रीस्टाइल कुस्तीपटू होते. हेलसिंकी येथील १९५२ मधील उन्हाळी ऑलिंपिकमध्ये त्यांनी कांस्यपदक मिळवले होते. ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकणारे ते स्वतंत्र भारतातील पहिले खेळाडू होते

३. (१९२९) गांधीवादी नेते आणि नोबेल पारितोषिक विजेते मार्टिन ल्युथर किंग यांचा जन्म

ते एक अमेरिकन सुधारक होते. ते अमेरिकन नागरी अधिकार चळवळीतील प्रमुख नेते होते. त्यांचा मुख्य वारसा म्हणजे अमेरिकेतील समान नागरी अधिकार. यासाठी ते आज मानवाधिकाराचे प्रतीक म्हणून ओळखले जातात

● निधन

१. (२००२) राष्ट्रपती पदक विजेत्या तमाशा कलावंत विठाबाई नारायणगावकर यांचे निधन

त्या अद्वितीय कलागुणांसह तमाम तमाशा रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या तमाशा सम्राज्ञी होत्या. विठाबाईना नृत्याची आवड होती. सावळ्या रंगाच्या पण देखण्या चेहरा असणाऱ्या ह्या नृत्यांगना आपल्या अदाकारीने रसिकांच्या मनावर हुकमत गाजवायच्या. त्यांनी 'पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची' ही लावणी अजरामर तर केलीच. पण त्याचबरोबर मुंबईची केळेवाली, विठ्ठल थोरात राशिनकर लिखित रक्तात न्हाली कु-हाड या वगनाट्यात वेडीची भूमिका सादर करून आपल्या सुंदरतेबरोबर आपला गोड गळा, आपला नृत्याविष्कार व उत्तम अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले

२. (२०१४) गोलपीठा कार साहित्यिक नामदेव लक्ष्मण ढसाळ यांचे निधन

ते मराठी कवी, विचारवंत, दलित साहित्यात परिवर्तन घडवणारे लेखक आणि बौद्ध-दलित चळवळीतील नेते होते. महानगरीय जीवनावर लिहिणारे आणि बोली भाषेत लेखन करणारे ते मराठीतले एक महत्त्वाचे लेखक होते. दलित समाजात त्यांनी आपल्या कविताच्या माध्यमातून जनजागृती केली

मुंबईतील गोलपीठा या वेश्यावस्ती असलेल्या भागातील झोपडपट्ट्यांमध्ये त्यांचे बालपण गेले. त्यांचे वडील खाटीक होते. नामदेव ढसाळांनी मुंबईमध्ये अनेक वर्षे टॅक्सी चालवली. ढसाळांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर मोठा प्रभाव होता. त्यांनी काव्य, गद्य, वृत्तपत्रांतील स्तंभलेखन यातून आंबेडकरांचे क्रांतिकारी विचार मांडले. त्यांच्या क्रांतिकारी साहित्याची दखल जागतिक पातळीवरही घेतली गेली

इ.स. १९७३ मध्ये नामदेव ढसाळ यांचा पहिला कवितासंग्रह गोलपीठा प्रकाशित झाला. मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले हा माओवादी विचारांवर आधारित, तर प्रियदर्शिनी हा त्यांचा इंदिरा गांधी यांच्या विषयीचा कविता संग्रह आहे. तसेच खेळ हा शृंगारिक कवितांचा संग्रह आहे

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर