दिनविशेष १३ जानेवारी

दिनविशेष

दि. १३ जानेवारी

◆ जन्म 

१. (१९३८) प्रसिद्ध संतूरवादक व संगीतकार पं. शिवकुमार शर्मा यांचा जन्म

ते एक ख्यातनाम भारतीय संतूर वादक होते. संतूर हे काश्मीरचे लोकवाद्य आहे. संतूर या वाद्याला लोकप्रिय करण्याचे श्रेय त्यांनाच जाते

२. (१९४९) पहिले भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा यांचा जन्म

ते अंतरिक्षात जाणारे पहिले भारतीय आहेत. भारताचे पहिले आणि जगातील १३८ वे अंतराळवीर बनण्याचा सन्मान विंग कमांडर राकेश शर्मा यांनी पटकावला तो २ एप्रिल १९८४ रोजी. भारत-रशिया अवकाश संशोधन मंडळ कार्यक्रमांतर्गत रशियाच्या सोयूझ टी-११ यानातून दोन रशियन अंतराळ संशोधकासमवेत राकेश शर्मा यांनी अवकाश सफरीचा अनुभव घेऊन या क्षेत्रात प्रगतीचे नवे दालन भारतीयांसाठी खुले केले

राकेश शर्मा पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी अंतराळातून बोलत होते. 'अंतराळातून भारत कसा दिसतो?', या प्रश्‍नाला त्यांनी 'सारे जहॉंसे अच्छा हिंदोस्तॉं हमारा' असे अभिमानी उत्तर दिले होते

● निधन

१. (२०११) ख्यातनाम मराठी अभिनेते प्रभाकर पणशीकर यांचे निधन

ते मराठी रंगभूमीवरील अभिनेते, दिग्दर्शक आणि नाट्यनिर्माते होते. प्रल्हाद केशव अत्रे लिखित 'तो मी नव्हेच' ह्या नाटकात साकार केलेल्या पाच वेगवेगळ्या भूमिकांमुळे ते संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले ते लखोबा लोखंडे या नावाने. त्यांच्या तो मी नव्हेच या नाटकानं इतिहास घडविला. 'इथे ओशाळला मृत्यू', 'थँक यु मिस्टर ग्लॅड', जेव्हा गवताला भाले फुटतात', ही त्यांची गाजलेली नाटकं. त्यांनी स्थापन केलेल्या नाट्यसंपदा ह्या नाट्यंसंस्थेचे 'कट्यार काळजात घुसली' हे संगीतनाटक विशेष प्रसिद्ध झाले

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर