दिनविशेष १२ जानेवारी
दिनविशेष
दि. १२ जानेवारी
■ दिनविशेष
१. राष्ट्रीय युवक दिन
१२ जानेवारी हा स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन ‘राष्ट्रीय युवक दिन’ म्हणून साजरा केला जातो. भारत सरकारने १९८४ मध्ये हा दिवस राष्ट्रीय युवक दिन म्हणून जाहीर केला. १९८५ पासून दरवर्षी १२ जानेवारी रोजी देशात राष्ट्रीय युवक दिन साजरा केला जातो. यामध्ये स्वामी विवेकानंदांची भाषणे, त्यांची शिकवण, प्रबोधन, देशप्रेम याविषयी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. असे कार्यक्रम तरुणांसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरली आहेत
★ घटना
१. (१७०५) सातारा ही मराठा साम्राज्याची राजधानी करण्यात आली. यावेळी छत्रपती शाहू महाराज यांचा राज्याभिषेक करण्यात आला
सातारा शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. पूर्वी हे शहर मराठ्यांची राजधानी होते
◆ जन्म
१. (१५९८) राजमाता जिजाऊ यांचा जन्म
त्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या. त्यांना राजमाता, राष्ट्रमाता, जिजाबाई किंवा जिजाऊ म्हणून संबोधले जाते. जिजाबाई त्यांच्या सद्गुण, शौर्य आणि दूरदृष्टीसाठी ओळखल्या जात होत्या. त्या एक कुशल घोडेस्वार देखील होत्या. त्या अत्यंत कुशलतेने तलवार चालवू शकत होत्या
२. (१८६३) भारतीय तत्त्वज्ञानाची महती जगभर पोहचवणारे स्वामी विवेकानंद यांचा जन्म
ते एक भारतीय संन्यासी आणि तत्त्वज्ञ होते. रामकृष्ण परमहंस यांचे ते शिष्य होते. 'माझ्या अमेरिकेच्या बहिणी आणि बंधूंनो...', या शब्दांनी सुरू झालेल्या त्यांच्या भाषणासाठी ते फार प्रसिद्ध आहेत, जे त्यांनी १८९३ मध्ये शिकागो येथील जागतिक धर्म परिषदेत केले होते
३. (१९१८) ज्येष्ठ संगीतकार रामचंद्र नरहर चितळकर उर्फ सी. रामचंद्र यांचा जन्म
ते एक भारतीय चित्रपट संगीतकार होते. चित्रपट निर्माते जयंत देसाई यांनी रामचंद्र ऊर्फ अण्णा चितळकरांना ‘सी रामचंद्र’ हे नाव दिले. सी. रामचंद्र यांनी ‘माझ्या जीवनाची सरगम’ या नावाचे आत्मचरित्र लिहिले
४. (१९७२) अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या महासचिव प्रियांका गांधी यांचा जन्म
● निधन
१. (१९३१) सोलापूरचे क्रांतिकारक समल्लाप्पा धनशेट्टी, किसन सारडा, जगन्नाथ शिंदे व कुरबान हुसेन यांना फाशी देण्यात आली
स्वातंत्र्य प्राप्तीपूर्वीच सोलापूर शहराने १९३० मध्ये ९, १० आणि ११ मे असे ३ दिवसांचे स्वातंत्र्य अनुभवले होते ते ४ क्रांतिकारकांमुळे. ते समल्लप्पा धनशेट्टी, किसन सारडा, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन या सोलापूरच्या चार हुतात्म्यांना १२ जानेवारी १९३१ ला येरवडा तुरुंगात फाशी देण्यात आली. हा दिवस सोलापुरात 'हुतात्मा दिन' म्हणून पाळला जातो
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment