दिनविशेष ०२ जानेवारी
दिनविशेष
दि. ०२ जानेवारी
■ दिनविशेष
१. (१९६१) महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना
महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना २ जानेवारी १९६१ साली करण्यात आली. माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला ध्वज प्रदान केला
◆ जन्म
१. (१९४३) हुतात्मा वीर भाई कोतवाल यांचे निधन
ते समाजसुधारक आणि क्रांतिकारक होते. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. भारताच्या स्वातंत्र्यासाठी असंख्य ज्ञात अज्ञात क्रांतिवीरांनी ब्रिटिशांविरुद्ध लढा देऊन बलिदान केले. त्यामध्ये हुतात्मा भाई कोतवाल आणि त्यांच्या आझाद दस्त्याचे कार्य फार मोलाचे आहे. चले जाव आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता
२. (१९४४) अस्पृश्यता निवारण हे जीवनध्येय मानलेले व्यासंगी समाजसुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे निधन
ते मराठी समाजसुधारक, धर्मसुधारक व लेखक होते. त्यांना कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे व महर्षी शिंदे असेही म्हटले जाते. शिंदे हे मानवी मूल्यांची जोपासना करण्यासाठी अविरत प्रयत्न करणारे त्यागाचे व निष्ठेचे प्रतीक होते. अज्ञानाच्या पूजेविरुद्ध वैचारिक बंड पुकारून जुन्या धार्मिक अनिष्ट परंपरांचे जोखड फेकून देणारे ते सुधारक होते. त्यांनी स्वातंत्र्य समता व बंधुत्व या तत्त्वांसाठी माणसातला माणूस जागा केला. मानवाने मानवावर समभावाने प्रेम करावे तसा आचार सर्वत्र घडावा म्हणून आपले जीवन समर्पित करणारे ते कर्मयोगी होते. विद्वत्ता, संयम व सेवावृत्ती या महान आदर्शाचे महामानव म्हणजे कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे हे होत. एक समाजसुधारक, अस्पृश्यता निवारणाचे खंदे पुरस्कर्ते, निरनिराळ्या धर्मांतील तत्त्वांचे संशोधक आणि ध्येयवादी विद्वान म्हणून ते ओळखले जातात
● निधन
१. (२०१५) मराठी विज्ञान परिषदेचे माजी अध्यक्ष, भारतीय हवामान शास्त्रज्ञ वसंत गोवारीकर यांचे निधन
ते भारतातील आघाडीचे शास्त्रज्ञ होते. ते इ.स. १९९१ ते इ.स. १९९३ या काळात भारताच्या पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार होते. वसंत गोवारीकर इ.स. १९९४ ते इ.स. २००० या काळात मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष होते. ते ज्ञान प्रबोधिनी संस्थेशी दीर्घ काळ निगडित होते
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment