दिनविशेष ०९ डिसेंबर

दिनविशेष

दि. ०९ डिसेंबर

■ दिनविशेष 

१. आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन

आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस (International Anti-Corruption Day) दरवर्षी 9 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. याचा उद्देश भ्रष्टाचाराच्या दुष्परिणामांबद्दल जागृती निर्माण करणे आणि त्याविरुद्ध लढण्यासाठी जनतेला प्रोत्साहित करणे हा आहे

भ्रष्टाचार हा समाजाच्या प्रगतीसाठी मोठा अडथळा आहे. तो केवळ आर्थिक हानी करत नाही, तर लोकांच्या विश्वासाला तडा देतो, आणि सामाजिक विषमता वाढवतो. या समस्येमुळे शिक्षण, आरोग्य, आणि रोजगाराच्या संधींवर नकारात्मक परिणाम होतो

संयुक्त राष्ट्रसंघाच्या पुढाकाराने हा दिवस साजरा केला जातो. विविध देशांमध्ये भ्रष्टाचार निर्मूलनासाठी कायदे, मोहिमा, आणि जनजागृती कार्यक्रम राबवले जातात. लोकशाही, पारदर्शकता, आणि जबाबदारी या मूल्यांची जपणूक करण्यासाठी भ्रष्टाचारविरोधी चळवळीला बळ दिले जाते

आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस प्रत्येकाला जागरूक राहण्याचा आणि स्वच्छ व पारदर्शक समाज घडवण्यासाठी योगदान देण्याचा संदेश देतो. प्रामाणिकपणा, नीतिमत्ता, आणि कायद्याचे पालन यामुळे भ्रष्टाचारमुक्त समाजाची उभारणी शक्य आहे

◆ जन्म 

१. (१८७८) कोल्हापूर संस्थानचे दिवाण व शिक्षणमंत्री अण्णासाहेब लठ्ठे यांचा जन्म

अण्णासाहेब लठ्ठे हे एक भारतीय राजकारणी, समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ तसेच सत्यशोधक समाज आणि ब्राह्मणेतर चळवळीचे नेते होते. इ.स. १९२५ मध्ये लठ्ठे यांची कोल्हापूर राज्याचे छत्रपती राजाराम तिसरे यांचे सल्लागार म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर दिवाण रघुनाथराव सबनीस यांच्या निवृत्तीनंतर त्यांची कोल्हापूरच्या दिवाणपदी नियुक्ती झाली

२. (१९४६) भारतीय राजकारणातील प्रभावशाली नेत्या, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या माजी अध्यक्षा मा. सोनियाजी गांधी यांचा जन्म

त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, या सर्वात जास्त काळ सत्तेत असणाऱ्या बलाढ्य राजकीय पक्षाच्या अध्यक्षा होत्या. १९९८ साली सोनिया गांधींनी काँग्रेसचे नेतृत्व स्वीकारले. २०१७ सालापर्यंत २२ वर्षे इतका काळ त्यांनी अध्यक्षपद सांभाळले

● निधन

१. (१९४२) हिंदी चिनी मैत्रीचे प्रतीक डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचे निधन

डॉ. द्वारकानाथ कोटणीस हे मराठी-भारतीय डॉक्टर होते. दुसऱ्या महायुद्धात जपानने चीनवर आक्रमण केलेले असताना डॉ. कोटणीस चीनला गेले होते. तेथे त्यांनी वैद्यकीय मोहिमेत भाग घेऊन चार वर्षे रुग्णसेवा केली. तेथेच डिसेंबर ९, १९४२ रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या जीवनावर 'डॉक्टर कोटनीस की अमर कहानी' नावाचा एक हिंदी चित्रपट व्ही.शांताराम यांनी काढला होता


२. (१९९७) कन्‍नड लेखक, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणवादी, चित्रपट निर्माते आणि विचारवंत के. शिवराम कारंथ यांचे निधन

ते ज्ञानपीठ पुरस्कार आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कन्नड भाषेतील साहित्यकार होते. कर्नाटकातील यक्षगान या लोककलेचे पुनरुज्जीवन कारंतांनी केले. त्यांनी लिहिलेल्या ४७ कादंबऱ्या हे केवळ आधुनिक कन्नड साहित्यासच दिलेले योगदानच नाही, तर भारतीय साहित्यविश्वास दिलेली समृद्धी आहे

#vishalinc5 #सातारा #satara

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर