दिनविशेष २५ डिसेंबर
दिनविशेष
दि. २५ डिसेंबर
■ दिनविशेष
१. नाताळ (ख्रिसमस)
नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी २५ डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो
२. मनुस्मृती दहन दिन
अस्पृश्य व स्त्रियांच्या मुक्ततेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ ला महाडमध्ये मनुस्मृतीचे दहन करून समाजातील अनिष्ट परंपरांचे जोखड मोडून काढले होते. हा दिवस महाड येथे मनुस्मृती दहन दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्राच्या विविध भागातून येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांच्या उपस्थितीत महाडमध्ये क्रांतीस्तंभ येथे मनुस्मृतीदहनाचा वर्धापन दिन साजरा करण्यात येतो
◆ जन्म
१. (१६४२) इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ सर आयझॅक न्यूटन यांचा जन्म
ते एक इंग्रज भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ व तत्त्वज्ञ होते. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत त्यांनी मांडला
२. (१९१९) भारतीय संगीतकार नौशाद अली यांचा जन्म
नौशादजी यांनी अनेक बॉलीवूड चित्रपटांना संगीत दिले. त्यांनी चित्रपट संगीतात हिंदुस्तानी शास्त्रीय रागदारीचा वापर केला. आजवरच्या सर्वश्रेष्ठ भारतीय संगीतकारांमध्ये नौशादजी यांचा उल्लेख केला जातो
३. (१९२४) भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांचा जन्म
ते भारताचे १० वे पंतप्रधान आणि एक हिंदी कवी होते
४. (१९३२) व्हायोलिनवादक, संगीत संयोजक व संगीतकार प्रभाकर जोग यांचा जन्म
ते महाराष्ट्रातले एक व्हायोलिनवादक आहेत. त्यांनी गजाननराव जोशी आणि नाराणराव मारुलीकर यांच्याकडून वयाच्या ५व्या-६व्या वर्षापासून गायन शिकायला सुरुवात केली. प्रभाकर जोग यांचे भाऊ वामनराव जोग हे आकाशवाणीवर व्हायोलिनवादक म्हणून नोकरी करत आणि घरी व्हायोलिनचे वर्ग घेत. प्रभाकर जोग आसपास रेंगाळून संगीताचा आस्वाद घेतच मोठे झाले
१९५२ साली प्रभाकर जोग हिंदी चित्रपसृष्टीत सॉंग व्हायोलिनिस्ट म्हणून दाखल झाले. रोशन, मदनमोहन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, राहुलदेव बर्मन या संगीत दिग्दर्शकांकडून त्यांना बोलावणी येऊ लागली. प्रभाकर जोग यांनी मराठी चित्रपट, ग्रामोफोन कंपन्या, आकाशवाणी आणि दूरदर्शन यांच्यासाठी संगीताच्या सुरावटी रचल्या आहेत
● निधन
१. (१९५७) साहित्यिक, विचारवंत व अस्पृश्यता निवारणासाठी सतत प्रयत्न करणारे कृतिशील समाजसुधारक प्रा. श्रीपाद महादेव तथा श्री. म. माटे यांचे निधन
माटे यांनी आयुष्यभर अस्पृश्योद्धाराचे काम केले. प्रासादिक, प्रसन्न, शैलीदार माटे हे विसाव्या शतकाच्या प्रथमार्धात कसदार व विपुल लेखन करणाऱ्यांपैकी एक होते. शिक्षक, कृतिशील सुधारक, नितळ-निर्व्याज 'माणूस' ही गुणविशेषणे त्यांना सार्थपणे लावली गेली. त्यांच्या आयुष्यातील लेखनपर्व तसे उशिरा सुरू झाले, पण एकदा सुरू झाल्यावर वीस वर्षे ते लिहीत राहिले. दहा हजारांहून जास्त भरतील इतकी छापील पृष्ठे त्यांच्या खात्यावर जमा आहेत. लेखनकाळ १९३० ते १९५५. संशोधन, संकलन, चरित्रे, वैचारिक, तत्त्वचिंतनात्मक, इतिहासमंथन, चालू घडामोडी, निबंध, ललितलेख... असा प्रचंड मोठा पट या लिखाणाचा आहे. पक्षिकेचा वारा ही त्यांची एकमेव कादंबरी
२. (१९७२) भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल, मद्रास इलाख्याचे मुख्यमंत्री, स्वातंत्र्यसेनानी, कायदेपंडित, मुत्सद्दी आणि लेखक चक्रवर्ती राजगोपालाचारी यांचे निधन
३. (१९७७) अभिनेता, दिग्दर्शक आणि संगीतकार चार्ली चॅपलिन यांचे निधन
ते मूकपटांमध्ये अभिनय करणारा इंग्लिश अभिनेते, दिग्दर्शक, संगीतकार होते. विनोदी ढंगाच्या मूकाभिनयासाठी त्यांची विशेष ख्याती होती. अभिनयासोबत ते मूकपटांचे लेखन, दिग्दर्शन सांभाळत असे, तसेच संगीतही रचत असे. चार्ली चॅप्लिन यांनी लोकांना भरभरून हसवले. त्यांच्या जीवनात खूप दुःख होत पण त्यांनी हे सर्व दुःख विसरून सर्वाना हासवण्यात आपले जीवन व्यतित केलं. त्या वेळी मूक चित्रपट असायचे, म्हणून चार्ली थोडासे जास्ती खास होते. त्यांनी एकही शब्द न काढता सर्वाना हसवले
४. (१९९४) भारताचे ७ वे राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांचे निधन
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment